एक्स्प्लोर

Nanded Politics : नांदेडमध्ये शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; माजी सभापती नेरलकरांनी बांधलं शिवबंधन

Nanded : आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला आहे. 

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना नांदेडमध्ये (Nanded) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नांदेड महानगरपालिकेतील (Nanded Municipal Corporation) माजी शिक्षण सभापती अपर्णा नेरलकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आणि चिमेगावच्या सरपंचांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला आहे. 

नांदेड शहर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अशोक चव्हाण यांची मोठी ताकद नांदेड शहराच्या राजकारणात आहे. दरम्यान, अशातच शिंदे गटाकडून नांदेडमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का देण्यात आला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती अपर्णा नेरलकर यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख उमेश दिघे,  चिमेगाव चे सरपंच शहाजी आढाव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. 

"नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध होत असलेला भरीव निधी आणि त्यातून शहराचा होत असलेला कायापालट यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातील काही जणांचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात नांदेड शहरातील अनेक राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश करणार असून, नांदेड जिल्ह्यात शिवसेना नंबर एकचा पक्ष असेल." असं आमदार बालाजीराव कल्याणकर म्हणाले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण? 

आगामी काळात नांदेड महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अततापासूनच कामाला लागले आहेत. महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच महत्वाचे नेत्यांकडून यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वच पक्षात फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर याची सुरवात झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात शहरातील राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. 

ही बातमी वाचा:  

Lumpy Skin Disease : नांदेड प्रशासनाकडून संपूर्ण जिल्हा 'लम्पी बाधीत क्षेत्र' म्हणून घोषित; नियमित क्षेत्राच्या बाहेर जनावरांना ने-आण करण्यास मनाई

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget