नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या  दुसऱ्या शूटरचा देखील ताबा  मिळाला आहे.  5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांच्या शारदानगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. 


एसआयटीने या प्रकरणात नांदेड मधून एकूण 17 जणांना अटक केली आहे. गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. गेल्या महिन्यात   संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटरला अटक केल होती. नांदेड पोलिसांनी चंदीगड तुरुंगातून 11 सप्टेंबरला नांदेडला आणले होते. सध्या तो कारागृहात आहे. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या शूटरचाही ताबा पोलिसांना मिळाला असून तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास आता सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले .


घरासमोरच गोळ्या घालून हत्या


 प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022  रोजी दिवसाढवळ्या त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती. 


संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरा महत्त्वाचा शूटर दीपक सुरेश रांगा फरार झाला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. मात्र अनेक राज्यात शोध घेऊन दीपक पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र बुधवारी (25 जानेवारी) एनआयएच्या पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन त्याला अटक केली आहे.


आरोपी दीपक रांगावर विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे


एनआयएने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. रांगा याने पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हेडक्वॉर्टरवर रॉकेट हल्ला केला होता.


ही बातमी वाचा: