एक्स्प्लोर

Nanded Murder Love Story: तरुणाच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या करणाऱ्या आचलच्या धाडसाचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक; म्हणाले 'तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची...'

Nanded Murder Love Story: आंचल मामीलवाड सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे काही विधी केले. तसेच तिने सगळ्यांदेखत कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू लावले.

Nanded Murder Love Story: नांदेड शहर गुरुवारी संध्याकाळी प्रेमप्रकरणातून एका मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाचा खून केल्याच्या घटनेनं हादरलं. सक्षम ताटे या तरुणाला मुलीचे वडील आणि दोन भावाने पाठलाग करुन निर्घृणपणे (Nanded Murder) संपवले. सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला संपवण्यात आले होते. सक्षम ताटे  याचे त्याच्या मित्राची बहीण आचल मामीलवाड हिच्याशी प्रेमसंबंध (Love) होते. याची कुणकुण लागल्यानंतर आंचलच्या वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु राहिल्याने गुरुवारी संध्याकाळी नांदेड (Nanded news) शहरातील जुना गंज भागात आंचलचे वडील आणि भावाने सक्षमची हत्या केली होती. संध्याकाळी 5 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास सक्षम ताटे याला मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले होते. याठिकाणी आल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघांनी मारहाण करुन त्याची हत्या केली. यावेळी प्रेयसी आंचल मामीलवाड सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे काही विधी केले. तसेच तिने सगळ्यांदेखत कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू लावले. अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपाळावर कुंकू भरले. यावेळी सक्षमला देखील हळद लावण्यात आली. या घटनेनं सर्वांनी हळहळ व्यक्त केली, तर आंचलच्या याच धाडसाचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केले आहे. 

Nanded Murder Love Story: प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत?

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे ह्या प्रेम प्रकरणाला विरोध होता व म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे हे सर्व घडवण्यात आले. या प्रकरणी मुलीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची घोषणा केली आणि आरोपी कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली. आम्ही तरुणीच्या या धाडसाचे दाद देतो. आम्ही खंबीरपणे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या सोबत उभे आहोत"असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Nanded Murder Love Story: आंचलच्या वाक्याने सगळेच हेलावले

सक्षम आणि आंचल या दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्यामुळे या दोघांचे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली आहे. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड, दोन भाऊ यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget