एक्स्प्लोर

नांदेड प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक, रस्त्यावर उतरून केलं आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी

Nanded : या घटनेत दोषी असलेल्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

नांदेड : शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुनच आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत असून, ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नांदेड (Nanded) शहरातील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. या घटनेत दोषी असलेल्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाले असून, त्यात 12 नवजात बालकांचा  समावेश आहे. या घटनेनंतर शिवसेना उबाठा गटाच्यावतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. 

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन...

यावेळी उद्धव ठाकरे गटाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, "डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांपैकी उपचार चालू असताना 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. या मध्ये 12 लहान बालकांचा समावेश आहे. सदरील दुर्घटना अत्यंत गंभीर असून निष्काळजी व अमानुशपणाचा कळस आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण हे साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. अशा घटनेने शासकीय रुग्णालयावरील उपचाराबाबतचा अविश्वास आणखीनच बळावेल. अशा घटना वारंवार घडणे दुर्दैवी आहे. या दुर्घटनेची परिपूर्ण सखोल चौकशी करून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अत्यंत कठोर कार्यवाही करण्यात यावी. रुणांच्या नातेवाईकास प्रत्येकी 25 लाखाची तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी," अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

खासदार हेमंत पाटील संतापले...

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 36 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने अनेक राजकीय नेते आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी रुग्णालयात पाहणी करत त्यांनी आढावा घेतला. रुग्णालयातील असुविधा पाहून हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडे बोल सुनावले. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीय. अशातच औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी केलीय.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nanded Government Hospital Incident : मृत्यूचं तांडव सुरुच! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget