एक्स्प्लोर

नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन

आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली होती.

नांदेड : नोकरी हे काचेचं भांडं असतं, त्यामुळे नोकरीत जपून वागावं असं म्हणतात, त्यात सरकारी नोकरी असल्यावर जास्त काळजी घ्यावी लागते. मात्र, नांदेड (Nanded) जिल्हा परिषदेतील एका प्रशासन अधिकाऱ्यास आपले वर्तन भोवले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे निलंबन केले आहे. परिषदेतील दुसऱ्या विभागात आपली बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबि (Suspend) करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव असून या घटनेनं नांदेड जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने हा मेसेज केला होता. त्यामुळे, या कृत्याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले आहे. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, निलंबन काळात आनंद सावंत यांना कुठलीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, तसेच निलंबन काळातील त्यांचे मुख्यालय गाव पंचायत हेच असणार आहे. या काळात त्यांना निलंबित निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहिल, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

 

 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
RCC Shivraj Motegaonkar : फी समान, मात्र फक्त 150 विद्यार्थ्यांना VIP सोय; मोटेगावकरने घेतलेला तो अँक्सेस, RCC ची Platinum बॅच कशी होती? चक्रावून टाकणारी Inside Story
फी समान, मात्र फक्त 150 विद्यार्थ्यांना VIP सोय; मोटेगावकरने घेतलेला तो अँक्सेस, RCC ची Platinum बॅच कशी होती? चक्रावून टाकणारी Inside Story
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

व्हिडीओ

Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Embed widget