एक्स्प्लोर

Nanded: रस्त्यावरून डाव्या बाजूने नाही तर उजव्या बाजूने चाला, रस्ते अपघात टाळण्यासाठी वॉक फॉर राईट साईड उपक्रम

Nanded News: रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन, यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत.

नांदेड:  पादचाऱ्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी नांदेड (Nanded News) जिल्ह्यामध्ये वॉक फॉर राईट साईड हा उपक्रम राबवण्यात आला. रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहनं आपल्याला दिसावीत आणि त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी नांदेड जिल्ह्यात उजव्या बाजूने चला ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.

रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन, यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजूनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने अधिर बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालताना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात 'उजव्या बाजूने चाला', 'वॉक ऑन राईट' ही अभिनव मोहिम आज प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.

या अभिनव मोहिमेचा शुभारंभ आज  जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवरांनी रॅली काढून,  उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली आहे. दरम्यान या उपक्रमात जिल्हाभरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातात सातत्याने वाढ होत आहे. बहुतेक अपघात हे रस्त्यांवरील हिट-अँड-रन प्रकरणे आहेत. जेथे प्रामुख्याने वाहनांची वर्दळ कमी असते आणि अपघातानंतर वाहनचालकांना घटनास्थळावरून पळून जाण्यास अधिक वाव असतो. 2021 मध्ये या उत्तर महाराष्ट्रात 2 हजार 530 जीवघेणे अपघात झाले. हीच बाब लक्षात घेऊन हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात खटला चालवला जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचना धुळे, नंदुरबार, जळगाव अशा पाच पोलिस युनिटच्या पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये 4,12,432 रस्ते अपघात झाला आहेत. यामध्ये एक लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वर्षभरात तीन लाख 84 हजार 448 जण रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 2020 मध्ये झालेल्या रस्ते अपघाताच्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघाताची संख्या कमी आहे. त्याशिवाय 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचं प्रमाणही कमी आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण 14.8 टक्केंनी कमी आहे. तर रस्ते अपघाताचं प्रमाण 8.1 टक्केंनी कमी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget