एक्स्प्लोर

Nanded : सिताखांडी घाटात टॅम्पो व मॅजिकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू 

Nanded : नांदेडमध्ये सिताखांडी घाटात टेम्पो आणि मॅजिकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.

Nanded : नांदेडमध्ये सिताखांडी घाटात टेम्पो आणि मॅजिकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण यामध्ये जखमी झाले आहेत. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातानंतर सिताखांडी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

भोकर तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात दुपारी एका टॅम्पो आणि मॅजिकचा भाषण अपघातात झाला. मॅजिकमधील चार जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात नांदेडकडे जाणाऱ्या टॅम्पो ( क्रमांक. ए एच 19 एस 4993) याच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरुन आलेल्या मॅजिकला जोरदार धडक झाली. मॅजिक नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणारे होते. या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मयताची नावे पुढीलप्रमाणे - भुलाबाई गणेश जाधव (वय 45 रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर) , संदिप किशनराव किसवे (वय 26, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम ( वय 48 रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय 57 रा. पाकीतांडा, ता. भोकर) हे चार प्रवासी अपघातामध्ये जागीच ठार झाले आहेत. सदरील अपघातात गंभीर जखमी पुढील प्रमाणे - परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी), कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय 22  रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) यांचा समावेश आहे. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अपघात इतका भयंकर होता की, मॅजिकमधील मृतांना काढण्यासाठी पत्रा कापावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या अपघातातील काही गंभीर जखमींना घटनास्थळाहूनच नांदेडला रवाना करण्यात आल्याने, मयत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Maharashtra Rain Weather updates: वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
Nanded : अवघे 10 हजारांचे कर्ज, शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू; मारहाण करून बनाव रचल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप
अवघे 10 हजारांचे कर्ज, शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू; मारहाण करून बनाव रचल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget