नांदेड : गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभागाकडून अनेक ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी नांदेडमध्येही या विभागाने एक मोठी कारवाई केली. येथील संजय भंडारी नावाच्या फायनान्स (Sanjay Bhandari Finance) व्यापाऱ्याच्या मालमत्तांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकला. या कारवाईत प्राप्तिकर विभागाने तब्बल 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त केली आहे. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


सोने, चांदी, रोकड जप्त


प्राप्तिकर विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून भंडारीच्या फायनान्सच्या कारभारावर पाळत ठेवली जात होती. त्यानंतर शुक्रवारी या विभागाने भंडारीविरोधात थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आपल्या या कारवाईत प्राप्तिकर विभआगाने एकूण 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 14 कोटी रुपये रोख स्वरुपात जप्त करण्यात आले आहेत. यासह 8 किलोचे दागिनेसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली ही 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तास लागले आहेत. आपल्या या कारवाईत प्राप्तीकर विभागाला काही महत्त्वाचे दस्तावेज मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. 72 तासांपेक्षा अधिक काळ ही कारवाई चालू होती. आता प्राप्तिकर विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. 


25 गाड्या 60 पेक्षा अधिक अधिकारी


मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी शहरातील शिवाजीनगर परिसरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये संजय भंडारी यांच्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थान यावरदेखील छापेमारी करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी 25 वाहनांत साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी आले होते. या पथकात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी इत्यादी शहरातील प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. कित्येक तास छापेमारीची ही कारवाई चालू होती.


नांदेडमध्ये दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण


दरम्यान, प्राप्तिकर विभागाने शु्क्रवारी भंडारी फायनान्ससह नांदेडमध्ये एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. या करवाईमुळे नांदेड शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. काही व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवरही छापेमारी झाल्याची वदंता तेथे पसरली होती. शुक्रवारपासून नांदेडमधील व्यापाऱ्यांत सध्या तणावाची स्थिती आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं


Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट


सोनोग्राफी जेल, टॅब, लॅपटॉप अन् 12 लाखांची रोकड; संभाजीनगरात 19 वर्षीय तरुणीकडून गर्भलिंगनिदानाचं रॅकेट; शहरात खळबळ!