एक्स्प्लोर

Nanded Heavy Rain: नांदेडमध्ये ढगफुटीसारख्या पावसाने 8 बळी, आमदार 24 तासांनी मुखेडमध्ये उगवले, चेहरा दिसताच ग्रामस्थ संतापले

पावसामुळे या भागात मोठे नुकसान होत असताना मुखेड मतदार संघाचे आमदार 24 तास उलटून गेल्यानंतर गावात पाहणीसाठी आले . त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे . 

Nanded Rain Update: नांदेडच्या लेंढी प्रकल्पाच्या पाणलोटात रात्री अडीचपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सात गावांना पाण्याचा वेढा पडला आहे .नांदेडमध्ये पावसाने 8 बळी घेतले आहेत. मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव भेंडेगाव या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला असून घरे पाण्याखाली गेली आहेत .पूरग्रस्तांची दैना पाहण्यासाठी 24 तासांनी मुखेडमध्ये भाजपचे आमदार तुषार राठोड आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत .

नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला असून आतापर्यंत एकूण आठ जणांचा बळी गेलाय .300हून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे . पावसामुळे या भागात मोठे नुकसान होत असताना मुखेड मतदार संघाचे आमदार 24 तास उलटून गेल्यानंतर गावात पाहणीसाठी आले . त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे . 

आमदार 24 तासांनी मुखेडमध्ये उगवले

हसनाळ गावात मुखेड ते भाजपचे आमदार तुषार राठोड पाहणीसाठी 24 तास उलटून गेल्यानंतर उगवले .त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे .संतप्त नागरिक स्थानिक आमदारांविरोधात एकवटले आहेत . आमदारांना प्रश्न विचारले जात आहेत ,जाब विचारला जातोय . पुराने नुकसान होत असताना 24 तास आमदार होते कुठं असावा उपस्थित केला जातोय . नांदेड मध्ये कोसळणाऱ्या पावसाने अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय .100 हून अधिक जण पुराच्या पाण्यात अडकले होते .बोटीने त्यांची सुटका करावी लागली .सैन्य दलाला सुद्धा प पाचारण करण्यात आलं होतं . इतकी आणीबाणी ओढवलेली असताना आमदार कुठे होते ?असा सवाल ग्रामस्थ करतायत .

मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एका रात्रीत झालेल्या पावसाने अनेकांचे संसार उध्वस्त केलेत. हसनाळ गावातील प्रदीप पाटील-हसनाळकर हे आपल्या उपजीविकेसाठी छोटासा किराणा दुकान चालवत होते. ह्या किराणा दुकानातील साहित्य पूर्णपणे खराब झालं आहे. तांदूळ, दाळसह सर्व किराणा माल पाण्यात भिजून गेलाय. इतकचं काय तर घरात ठेवलेली महत्वाची कागदपत्रे पाण्यात पूर्णपणे भिजून गेलेत.

नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती; लेंढी प्रकल्प क्षेत्राची चौकशी होणार

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. प्रशासनाने तात्काळ यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केली आहे आणि अनेकांचे जीव प्रशासनाने वाचवले. दुर्दैवाने नांदेड जिल्ह्यातील पाच लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. तेलंगणामधील काही लोक देखील वाहून गेली आहेत. दक्षिणेतील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू असल्याने पाणी पातळी कमी होण्यास मदत होते. लेंढी धरण क्षेत्रात 30 टक्के पाणीसाठा करण्याचा विचार होता. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कसा आला या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटला चौकशी करण्यास सांगितले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 'ABP माझा 'ला दिली .

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget