Marathwada Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गंगापूर येथे आयोजित 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. जगदीश कदम हे गेल्या पाच शतकांपासून लेखन करीत असून कथा, कविता,कादंबरी, नाटक, चरित्र, व्यक्तिचित्र, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर,ऐसी कळवळ्याची जाती हे कवितासंग्रह  लिहले आहे. 


त्यांनी मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय हे कथासंग्रह लिहले. गाडा, ओले मूळ भेदी कांदबऱ्या लिहल्या आहेत. बुडत्याचे पाय खोलात,वडगाव लाईव्ह ही नाटके लिहले आहेत. आकलन आणि आस्वाद हा समीक्षेचा ग्रंथ लिहला. म.ज्योतिबा फुले,म.गौतम बुद्ध ही चरित्र पुस्तके लिहले. गांधी समजून घेताना हे वैचारिक पुस्तक लिहिले असून कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये त्यांच्या नाटकांचा अनुवाद झाला आहे.


काही ठळक नोंदी



  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार- 1998 (रास आणि गोंडर) 

  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड़मय निर्मिती पुरस्कार- 1999 (बुडत्याचे पाय खोलात)

  • विशाखा प्रथम काव्य पुरस्कार,नाशिक 1999 

  • भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,कोपरगाव 1999 

  • यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे

  • ऊर्मीचा ना.धों.महानोर साहित्य पुरस्कार,जालना 2009 

  • करकाळा येथील जनसंवाद साहित्य पुरस्कार 2008 

  • जि.प.नांदेडचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार 2009 

  • आविष्कार साहित्य मंडळाचा भारतभूषण  पुरस्कार 2009

  • कै.विलास भोसले राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार, उदगीर 2013 

  • अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार,पुणे 2013 

  • सत्यशोधक साहित्य पुरस्कार, 14  वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन, नांदेड 2013 

  • प्रसाद बन साहित्य पुरस्कार 2015 

  • दर्पण साहित्यिक-पत्रकार पुरस्कार 2017 

  • कुमार देशमुख नाट्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद,औरंगाबाद 2020 

  • गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार,गदिमा प्रतिष्ठान व कामगार साहित्य सभा,पुणे 2020 

  • सह्याद्री साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे 2021 

  • यशवंतराव चव्हाण स्मृती समिती,अंबाजोगाई, यशवंतराव चव्हाण स्मृती सन्मान 2020 

  • केशवसुत काव्यप्रतिभा पुरस्कार, मालगुंड 1 मे 2023

  • कवीवर्य नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार,नेरळ(मुंबई) 2023 

  • भारत सरकारच्या साहित्य अकादमीची प्रवासवृती 1999 

  • अध्यक्ष,पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन,पेठशिवणी जि.परभणी 2023

  • अध्यक्ष, आविष्कार साहित्य संमेलन, हदगाव 2003

  • अध्यक्ष, तिसरे शिक्षक साहित्य संमेलन,नांदेड 2016 

  • अध्यक्ष,पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन,पळसप (उस्मानाबाद) 2017

  • अध्यक्ष, पहिले राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन,बरबडा 2017

  • राज्यस्तरीय कविसंमेलन नांदेड महापालिका 2022  अध्यक्ष

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान परिसंवाद सहभाग-निमंत्रित वक्ता

  • तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूर येथे निमंत्रित वक्ते 2011 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड