एक्स्प्लोर

मोठी बातमी : चिखलीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा विरोध, गावातून काढ

Maratha Protestors Aggressive : अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे पाहायला मिळाले. 

Maratha Protestors Aggressive : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मराठा आंदोलकांच्या (Maratha Protestors) रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे (Nanded Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. आंदोलकांचा रोष पाहता अशोकचव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे पाहायला मिळाले. 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी आले होते. मात्र, यावेळी 'एक मराठा-लाख मराठा'सह विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोषपाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. 

नेमकं काय घडलं? 

भाजपकडून नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण देखील गावागावात जाऊन प्रचार करत आहेत. गावकऱ्यांच्या भेठीगाठी घेऊन ते प्रचार करतांना दिसत आहे. दरम्यान, आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे अशोक चव्हाण प्रचारासाठी गेले होते. मात्र, गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचे म्हटले. त्यामुळे गावात येऊ देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेत जोरदार घोषणाबाजी केली. गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका पाहता अशोक चव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला. 

पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप...

अशोक चव्हाण कोंढा गावात पोहचताच गावकरी एकत्रित जमा झाले आणि चव्हाण यांना गावात येण्यासाठी विरोध केला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचे म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अनेक तरुण थेट अशोक चव्हाण यांच्या गाडीसमोर आले. त्यामुळे गाडी पुढे घेऊन जाने देखील शक्य होते नव्हते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत अशोक चव्हाण यांच्या गाडीसमोर असलेल्या तरुणांना बाजूला केले आणि गाडीला जागा करून दिली. अशोक चव्हाण यांचा ताफा गावातून परत निघाल्यावर देखील 'एक मराठा लाख मराठा' असा घोषणा देण्यात आल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget