Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) इस्लापुरच्या परोटी तांडा येथे एक संतापजनक प्रकार समोर आला असून, पत्नीला बेदम मारहाण करत तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विवाहित तरुणीला तू दिसायला चांगली नाहीस, तुझ्या माहेराहून रुपये घेऊन ये, या कारणावरून पतीकडून मारहाण करताना 6 मे रोजी सकाळी विवाहितेचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा गोकुळ चव्हाण (वय 30 वर्षे) असे मयत महिलेच नाव असून, गोकुळ नामदेव चव्हाण (वय 35 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, परोटी येथील रेश्मा चव्हाण तरुणीचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तिला दोन मुली, एक मुलगा आहे. दरम्यान सुरवातीला सर्व काही सुरळीत सुरु असताना काही दिवसांनी पती गोकुळ नामदेव चव्हाण, सासू विमलबाई नामदेव चव्हाण, कृष्णा नामदेव चव्हाण हे रेश्माला सतत त्रास देऊ लागले. तू दिसायला चांगली नाहीस, तू माहेरून खर्चासाठी रुपये घेऊन ये या कारणाने पती सतत तिला मारहाण करीत असे. दरम्यान 6 मे रोजी देखील पती गोकुळ याच्याकडून रेश्माला बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे.
अखेर पोलिसात गुन्हा दाखल...
रेश्माला करण्यात आलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या नातेवाइकांना माहिती मिळाल्याने त्यांनी इस्लापूर पोलिस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी नवरा, सासू, दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर वैद्यकीय अधिकारी मंडगीरकर व जलधरा येथील वैद्यकीय अधिकारी नरवाडे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी भेट दिली. तर पुढील तपास सपोनि वाहुळे व उपनिरीक्षक योगेश बोधगिरे हे करीत आहेत.
पती नेहमी मारहाण करायचा...
रेश्मा आणि गोकुळ यांच्या लग्नाला दहा वर्षे झाले आहेत. मात्र रेश्मा चांगली दिसत नसल्याचे म्हणत तीच पती तिला नेहमी त्रास द्यायचा. तसेच तिला मारहाण देखील करायचा. सोबतच माहेरून खर्चासाठी रुपये घेऊन ये या कारणाने सतत वाद घालून मारहाण करत असे, असा आरोप रेश्माच्या माहेरच्या लोकांनी दिला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर विधवेशी शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत; पोलिसात गुन्हा दाखल