Nanded News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते तथा आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पुन्हा एकदा केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र याचवेळी बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी विरोधकांना थेट ठेचण्याची भाषा केली. सोशल मीडियावरुन आपल्यावर टीका करणाऱ्यांना ठेचण्याचे काम करावे लागणार असल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकना शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासमोर त्याने हे वक्तव्य केले. 


नांदेड येथे शनिवारी (27 मे) रोजी शिवसेनेचा (शिंदे गट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना संतोष बांगर म्हणाले की, "फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कोणी जर आपल्याला बोलत असेल, तर त्याला तिथल्या तिथे ठेचण्याचे काम आपल्याला करावे लागेल." त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत आहे. 


विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप...


दरम्यान याचवेळी बोलताना संतोष बांगर यांनी शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख बबन थोरात यांचावर तोफ डागली आहे. "जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्याची चैन द्यावी लागले, तसेच विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचं बक्षीस देखील मी दिले असल्याचा आरोप बांगर यांनी केला. तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते. त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका, खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचे काम केले असल्याचा आरोप बांगर यांनी केले. तसेच जे लोक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, ते सुद्धा आपल्याकडे येतील असं देखील संतोष बांगर म्हणाले. 


आजीबाईंचं श्रीकांत शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे...


खासदार श्रीकांत शिंदे हे शनिवारी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव येथील कयाधू नदीवरील पुलाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका आजीबाईने त्यांना गाठले. नातू कामाला पुण्याला गेला, आता कोणी नाई तुमच्या बिगर, साहेब मला घर बांधून द्या असे गाऱ्हाणे आजीने शिंदे यांच्यासमोर मांडले. शिंदे यांनीही तातडीने आजीबाईला घरकूल बांधून देण्याच्या सूचना केल्या. यावेळी शिंदे यांनी आत्मियतेने आजीबाईंशी संवाद साधला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? संजय राऊतांचा संतोष बांगरांवर निशाणा