Nanded Crime News: गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यासह शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान चोऱ्यांच्या अनेक घटना ताज्या असतानाच, काल रात्री हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Congress MLA Madhavrao Patil Jawalgaonkar) यांच्या कदमनगर येथे  असलेल्या पक्ष कार्यालयातच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यावेळी सीसीटीव्हीची (CCTV Camera) नासधूस करत चोरट्यांनी मोबाईलसह इतर साहित्यावर डल्ला मारलाय. थेट आमदारांच कार्यालय फुटल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


माधवराव पाटील यांच्या कार्यालयात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चांगलाच धुमाकूळ घातला. यावेळी अंध दिव्यांगासाठी वाटपासाठी आणलेले तीन मोबाईल चोरट्यांनी लांबवले आहेत. आज सकाळी आमदारांच्या पक्ष कार्यालयात नेहमी प्रमाणे तिथे असलेले सेवक कार्यालयात आले असता सर्व प्रकार समोर आला. पक्ष कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व ईतर साहित्य इतरत्र पडले होते. त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. 


सामान्यांच्या घरानंतर आमदारांच्या घरीच चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली. तर पोलिसांनी श्वान पथकासह धाव घेतली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिव्यांगासाठी वाटप करण्यात येणाऱ्या मोबाईलपैकी तीन मोबाईल चोरीला गेल्याचे निदर्शास आले आहे. तर यावेळी आपली ओळख पटू नयेत म्हणून चोरट्यांनी कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस केली. पण मोबाईल वेतिरिक्त कार्यालयात चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी काढता पाय घेतला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. 


पोलिसांसमोर तपासाचे आव्हान...


आधीच हदगाव शहरात चोरट्यांच्या धुमाकूळमुळे पोलिसांची अडचण वाढली असतांना, आता चक्क एका आमदारांच्या कार्यालयावरचं चोरट्यांनी डल्ला मारत एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या चोरांचा शोध घेऊन बेड्या ठोकण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे आता पोलीस या चोरट्यांच्या शोध घेण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...


गेली काही दिवस शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता चक्क आमदार पाटील यांचे कार्यालय चोरट्यांनी फोडल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर आमदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामन्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असाही प्रश्न आता नागरीक उपस्थित करत आहे. त्यामुळे परिसरात आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Nanded: नांदेडची सेजल बनली भारतातील पहिली तृतियपंथीय सेतू केंद्र चालक


Nanded Sanitary: महापालिकेने वसवलेल्या तेहरानगरात राहणाऱ्या दृष्टिहीन नागरिकांच्या वसाहतीत घाणीचे साम्राज्य