एक्स्प्लोर

Nanded : दोन मुलींच्या लग्नाची चिंता, पित्याने संपवली जीवनयात्रा; नांदेड जिल्ह्यातील घटना

Nanded Suicide News :  मुलींच्या लग्नाची चिंता तसेच आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने बेरोजगार पित्याने स्वतःला पेटवून घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

Nanded Suicide News : नांदेड जिल्ह्यात (Nanded District) एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, दोन मुलींच्या लग्नाची चिंता तसेच आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने बेरोजगार पित्याने स्वतःला पेटवून घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथे शुक्रवारी (24 मार्च) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घडली आहे. नंदू जाधव (वय 37 वर्षे) असे मृताचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदू जाधव हे खाजगी बस चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. वाढती महागाई व लोकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करणे व दोन मुली लग्नाला आल्यामुळे ते सतत चिंतेत होते. लोकांचे देणे झाले असल्याने आणि हातात येणाऱ्या तोडक्या पगारातून पैश्यांची जुडवाजुडव होत नव्हती. तसेच दोन मुलींच्या लग्नासाठी पैसे कोठून आणावे या चिंतेत नंदू जाधव असायचे. त्यामुळे याच चिंतेतून त्यांनी अंगावर डीझेल घेऊन स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. 

पोलिसांची घटनास्थळी धाव... 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत  भाजलेल्या अवस्थेत असलेल्या जाधव यांचा मृत्यू झाल्याने, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ईस्लापूर येथे पाठीवले होते. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

मजुराच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल 

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी  बांधकाम कंत्राटदारवर गुन्हा दाखल केला आहे. नांदेड शहरातील महापालिकेच्या महात्मा फुले व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कामावर असलेल्या बालाजी रामा खंडागळे या मजुराचा 15 मार्च रोजी पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कंत्राटदाराने पाचवा मजला ते पहिला मजला या दरम्यान मोकळ्या असलेल्या जागेवर सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. तसेच कामगारांकडून सुरक्षिततेची साधने न वापरता काम करून घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणा केल्याचे तपासात पुढे आल्याने कंत्राटदार रामानी पटेल याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nanded Crime: धक्कादायक! नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजीर अन् एअर गन; शाळेतच तयार होतायत 'गॅंग'

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget