एक्स्प्लोर

Nanded Accident News: प्रसिद्ध कीर्तनकाराला ट्रकने चिरडलं, शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन, पण नियतीने केला घात!

Nanded Accident News: वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं.

नांदेड : कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला. वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर (Nanded Kirtankar Madhukar Maharaj Barulkar) यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. (Nanded Kirtankar Madhukar Maharaj Barulkar) 

ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील रहिवासी आहेत. शिवाय मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. मागील अनेक वर्षापासून संघटनेत जोमाने काम करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अंधश्रद्धेपासून समाज दूर राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती. बैठक संपन्न झाल्यानंतर ते दुचाकीने परत बारूळ गावी जातं होते  सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील रुबी हॉटेल जवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने जातं असलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.(Nanded Kirtankar Madhukar Maharaj Barulkar) 

ट्रकखाली चिरडल्या गेल्याने ह.भ.प मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. लग्न गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी आहे. असे असताना शहरात जड वाहनाची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडको हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची रेलचेल दिवसभर सुरूच असते. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने अनेकांना चिरडल्याच्या घटना घडल्या आहे. अशा वाहनावर कायमस्वरूपी बंधन आणावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होतं आहे.(Nanded Kirtankar Madhukar Maharaj Barulkar) 

तलवार बाबांच्या समर्थकांचा पोलीस ठाण्यात राडा

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेड जिल्ह्यात तलवार बाबा चर्चेत आला आहे. बिलोली तालुक्यातील बडूर इथल्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलय. तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला बिलोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर बाबाच्या समर्थकांनी ठाण्यात गोंधळ घालत पोलिसालाच धमक्या दिल्या आहेत. त्याचबरोबर भोंदू बाबावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रे त्याच्या दोन समर्थकांनी फाडून फेकले. या प्रकरणी पोलिसांनी बाबाच्या दोन समर्थकांना देखील अटक केलय. हा भोंदूबाबा हाथात तलवार घेऊन लोकांची फसवणूक करत होता. आता त्याच्या समर्थकांने दादागिरी केल्याने खळबळ उडाली आहे.

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Embed widget