एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, वडगावचा संपर्क तुटला, दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या 4 दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गानं हिमायतनगर गाठावं लागत आहे. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. 

हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळं जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं  आहे. वडगाव जवळील पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.

वडगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची भिस्त असलेला सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफलो झाला आहे. गाव परिसराला पुराच्या पाण्यामुळं वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढवण्यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कॅनॉल असून, उजवा कॅनॉल 12 किलोमीटरचा तर डावा कालवा 6  किलोमीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2 हजार 840 मीटर आहे. आज घडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्यानं कॅनॉल दुरुस्ती झाली नसल्यानं व्यवस्थावपन बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडत आहे.
 
दरम्यान, सुना तलावाच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामुळं वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्यानं मुसळधार पावसामुळं पाणी नाल्यावरुन वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसापासून गावचा संपर्क तुटला आहे. गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी  ग्रामस्थांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
Embed widget