नांदेड: कधी कोणती वस्तू महाग होईल अन् कधी कोणती वस्तू स्वस्त होईल हे सध्या सांगणं कठीण आहे. अगदी तसेच आता माळेगावच्या यात्रेत (Malegaon Yatra) देखील होत आहे. उंटासारखे प्राणी स्वस्तात विकले जात असताना गाढवाचे भाव मात्र चांगलेच वाढलेले आहे. पण गाढवाचे (Donkey) भाव का वाढले हे जाणून घेऊया.
गाढव हा शब्द ऐकताच अनेकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. गाढव म्हणजे ज्याला काहीच कळत नाही पण मंडळी आता या गाढवांना चांगलाच भाव आला आहे.गाढव म्हणजे मुकाट्याने कष्ट करणारा प्राणी आहे. या गाढवाच्या खरेदी विक्रीचे महाराष्ट्रात चार बाजार भरतात. माळेगाव,जेजुरी,गांधी अन् देऊळगाव राजा या चारच ठिकाणी गाढवांचा बाजार असतो. त्याला दिवसभर राबवून घ्यायचे अन संध्याकाळी मोकळे सोडायचे. गाढवाने दिवसभर केलेल्या कष्टातून त्याच्या मालकाची पोटाची खळगी भरते. माळेगावच्या यात्रेत यंदाही गाढवे खरेदी विक्री बाजार भरला आहे पण यंदा मात्र गाढवांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
गाढवांच्या किमती वाढल्या
गाढवाच्या प्रामुख्याने चार जाती असतात. काठेवाडी, लसण्या, खेचर अन् जंगली...यातील जंगली गाढवाला ग्राहक मिळत नाहीत. कारण त्याचा काही उपयोग नाही. खेचर गाढव थंड प्रदेशात उपयोगी आहे तर काठेवाडी गाढव पहाडांवर सामान ने आण करण्यासाठी उपयोगी पडते. लसण्या गाढव मात्र रेती मुरूम किंवा अन्य ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडते. आता गाढवांच्या किमती वाढल्या आहेत कारण काही भागांत गाढवाचे मांस विक्री होत आहे.
माळेगावच्या जत्रेत वाढल्या गाढवाच्या किंमती
परिणामी बाजारात गाढवांची संख्या घेतली आहे अन् त्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. खरंतर गाढव हा शब्द कुणाला हिणवण्यासाठी किंमत नाही हे दर्शवण्यासाठी मनुष्य वापरतो पण माळेगावच्या जत्रेत गाढवांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेतल्या तर गाढव आता भाव खातंय असेच म्हणावे लागेल.
गाढविणीच्या दूधाला मागणी
गाढविणीच्या दुधामुळे सर्दी , खोकला, कफ , न्यूमोनिया असे आजार होत नाहीत असा समज आहे. लहान मुलांना सर्दी, पडले असे आजार होऊ नये झाल्यास दुरुस्त होण्यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा. गाढविणीच्या दुधाचे सेवन केल्याने सायटो कायनिन नावाचा महत्त्वाचा घटक मानवी शरीरात वाढतो ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते. त्यामुळे गाढविणीचे दूध महाग विकले जाते.
हे ही वाचा :
Donkey Milk: गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी; चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात 100 रूपये