Ashok Chavan On Maharashtra Politics: राज्यभर राजकीय टकरी होत असताना गावागावात टकरी होणे स्वाभाविक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या राज्यभरात जत्रांचा मौसम सुरू असताना बऱ्याच जत्रांमध्ये रेड्यांच्या टकरी घेण्यात येत आहेत, यावरून अशोक चव्हाण यांनी अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्जाच्या घडामोडीवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, सत्यजित तांबे यांनी अशा पद्धतीने पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर आहे.दरम्यान मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंचे हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता.दरम्यान जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती, पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणे गंभीर बाब आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी कोणत्या पक्षात यावं अथवा कोणत्या पक्षात जावं हा त्यांनी निर्णय घ्यावा
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावरुन बोलताना,चव्हाण म्हणाले की पंकजा मुंडे ह्या कर्तृत्ववान नेत्या असून त्यांना अनेक वर्षाचा सभागृहाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या पक्षात यावं अथवा कोणत्या पक्षात जावं हा त्यांनी निर्णय घ्यावा.तर कुठल्या घोड्यावर बसल्यावर बसल्यावर फायदा होऊ शकतो हे पंकजा मुंडेंनी ठरवावे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले की, अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या बजट तरतूदी आणि सभागृहाने पारित केलेल्या कामावर स्थगिती देण्यात येतेय, हे योग्य नाही.दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोप करत रहा पण विकासात्मक कामे स्थगित करणे बरोबर नाही, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले की, सत्यजित तांबे यांनी अशा पद्धतीने पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल कारण्याचा मुद्दा गंभीर आहे.दरम्यान मूळ उमेदवार हे सुधीर तांबे असताना त्यांनी नामांकन पत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंचे हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता.दरम्यान जर मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती, पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणे गंभीर बाब आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.