Nana Patole on Sanjay Raut : संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार ही  नाही. मूळ प्रश्न आज देशातला शेतकरी अडचणीत आलाय, हा आहे. देशाला कसं सुरक्षित करता येतं यावर आमचा भर आहे. बीड आणि परभणीचं प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सरकारजवळ अद्यावत माहिती आहे. जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालविला आहे.


महाराष्ट्राच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल. तिथून आम्ही सगळे एका ताकतीने महाराष्ट्रात येऊ. महाराष्ट्र आजही काँग्रेसचा आहे, उद्याही राहील. अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.


छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू


संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार नाही. मूळ प्रश्न आज देशातला शेतकरी अडचणीत आलाय. महागाईमुळे लोकं परेशान आहे. देशाच्या सीमा चीन रोज आपल्या कब्जात घेतायेत, त्यामुळं देश धोक्यात आलाय. देशाची लोकशाही धोक्यात आलीय. काँग्रेससमोर देश पहिले आणि मग हे छुटूक मुटूक राजकारण. यांचा आम्ही नंतर विचार करू. देशाला कसं सुरक्षित करता येतं यावर आमचा भर आहे. त्यामुळं संजय राऊत आणि अन्य काय बोलतात याकडे लक्ष द्यावं असं वाटतं नाही. असा टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला. निवडणूक काळात जागा वाटपावरून संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याला नानांनी उत्तर दिलं आहे.


बीड आणि परभणी प्रकरण हे सरकार पुरस्कृत


बीड आणि परभणीचं प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सरकारजवळ अद्यावत माहिती आहे. सरकारचेच आमदार माहिती घेऊन मीडियासमोर आणि विधानसभेत बोलतायत. सरकारकडे अद्यावत माहिती असतानाही एसआयटी नेमायची, चौकशी लावायची, हा जो खेळ सरकार करीत आहे. जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालविला आहे. महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो खेळ चालविला आहे, तो थांबविला पाहिजे. आरोपींवर तातडीने कारवाई केली पाहिजे, फाशीची सजा त्यांना दिली पाहिजे. यानंतर महाराष्ट्रातच्या प्रतिमेला काळीमा फासणारी माणसं निर्माण होऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. पण, महाराष्ट्राच्या सरकारनं तमाशा करून ठेवलाय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर बीड आणि परभणी प्रकरणावरून केली.


लाडक्या बहीण योजनेसाठी नवीन नियम म्हणजे बहि‍णींचा विश्वासघात


निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहि‍णींचं मतं घेण्याचं पाप महायुतीच्या सरकारनं केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे कमी कसे करता येईल, त्यांच्या तोंडातील घास कसा हिरावता येईल, एकीकडे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले. त्याच काळात महागाई 5 हजार रुपयांनी वाढविली, बहिनींकडून महागाईच्या नावावर लुटलं आणि आता बहिणींना लुटायचा प्रकार सरकार करते आहे. ज्या पद्धतीने सरकारने घोषणा केली होती आणि बहिणींना त्याप्रमाणे एकविसशे रुपये महिना द्यायला पाहिजे. बहिणींना धमकावून हे बंद केलं पाहिजे, व्याजा सकट आणि पैसे परत घेऊ अशी सरकारमधील आमदार आणि मंत्री म्हणत असतील तर हे बंद केलं पाहिजे. त्या बहिणी योजनेसाठी नवीन नियम लावण्याचा प्रकार म्हणजे लाडक्या बहिणींचा विश्वासघात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला आहे. 


हे ही वाचा