Horoscope Today 17 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 17 मे 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज अति संवेदनशीलतेमुळे निराश होण्याचे योग येतील एखाद्याबद्दल खूप अनुकंपा वाटेल आणि त्यांना मदतही कराल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज जवळच्या नात्यांमधून अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवाल, कोठेही अंधविश्वास ठेवून काम करू नका  

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज एखाद्या आव्हान पेलण्याचे मनोरत काम कराल, परंतु आपल्या जवळच्या सामर्थ्याचा अंदाज घ्या नाहीतर निराशा पदरात पडेल  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात काही त्रास संभवतील, महिला थोड्या विसरभोळ्या बनतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज निराश झालेल्या मनाची विकल अवस्था विचारानेच जागेवर येणार आहे, हे आज लक्षात ठेवा.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज थोडेसे लहरी आणि विक्षिप्त बनाल कोणत्याही कामाचा ताण जास्त घेऊ नका.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज अति स्पष्ट आणि परखड बोलण्याने सहवासातील जवळच्या लोकांची मने दुखावली जातील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही, कामांमध्ये सतत नाविन्य शोधण्याकडे आणि बदलण्याकडे कल राहील.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज संपत्ती स्थितीमध्ये सतत चढ-उतार होऊ शकतात, मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे थोडे वैतागून जाल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये कित्येक वेळा एकांगी विचार कराल आणि असे विचार जवळच्या लोकांना रुचणार नाहीत 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ओंकार याचा आधार घ्यावा, व्यापार धंद्यातील बौद्धिक झेप वाढेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज बरेच दिवसांपासून एखादे काम करण्याची इच्छा पूर्ण होईल, पैशाची चणचण दूर झाल्याने हायसे वाटेल.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मे महिन्याचा चौथा आठवडा भाग्याचा की चिंतेचा? साप्ताहिक राशीभविष्य वाचा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)