Don Special Report : डॉनने फाडला अनाड्यांचा बुरखा, पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं?
Don Special Report : डॉनने फाडला अनाड्यांचा बुरखा, पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं?
भारताशी झालेल्या संघर्षात पाकच्या कुटील डावाला तुर्की, चीनसारख्या देशांची साथ मिळाली. त्यांच्याकडून मिळालेल्या संरक्षण यंत्रणेच्या बळावर भारताला भिडण्याचं धाडस पाकने केलं. अर्थात या यंत्रणेला भारताने कुचकामी ठरवलंच. आता पाकच्या या कावेबाज मित्रांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी भारताला प्लॅनिंग करावं लागणार आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पडला. पाकिस्तानच्या एअर डिफेन्समधली भगदाडं उघडी पडली. पाकिस्तानच्या न्युक्लिअर युद्धाच्या धमकीतील फोलपणा उघडा पडला आणि उघडा पडला तो प्रत्येक देश, ज्याने दहशतवादी पाकिस्तानला भारताविरोधात मदत केली. या देशांमध्ये सर्वात मोठं नाव अर्थातच चीन आणि त्यानंतर तुर्कस्तान. पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कस्तान पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिला. तुर्कस्तानला आशियातील इस्लामी देशांचा नेता बनायचं आहे. त्यासाठी त्या देशाचे अध्यक्ष एर्दोगान पाकिस्तान, मलेशिया अशा देशांची मोट बांधत आहे. तुर्कस्तानने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दशकात या दोन्ही देशात लष्करी देवाणघेवाण वाढली आहे.