भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर गावातील (शेषराव) या शेतकऱ्यानं उमरेड मधील सावकार (अभयचंद्र पाटील) या सावकराकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी आपली दोन एकर शेती त्यांच्याकडे गहाण ठेवली. मात्र, सावकारानं शेतकऱ्याची जमीन गहाण न ठेवता धोक्यानं आपल्या नावानं रजिस्ट्री करून घेतली. दोन वर्षानंतर जेव्हा शेतकरी कर्जाची रक्कम घेऊन गेला. त्यावेळी या सावकारानं जमीन आपल्या मालकीची असल्याचं सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्याला धक्का बसला. दरम्यान या वर्षी लवकर पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यानं पत्नीसह शेतात पेरणी केली. मात्र, या सावकारानं 20 जून रोजी ट्रक्टरनं शेतकरी दाम्पत्याने केलेली पेरणी नष्ट केली. तसंच सावकाराने दोघांना शेतात येण्यास मज्जाव केला. सावकाराच्या पत्नीने (प्राजक्ता) शेतकऱ्यांच्या पत्नीला मारहाण केली असा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. सावकार आणि तिच्या पत्नीने माझ्या अंगावरील साडी सोडली, असा आरोपही शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे.
बियाणांमध्ये दोष आढळल्यास महाबिजवरही कारवाई करू, कृषिमंत्री दादा भुसे आक्रमक
तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाही
घटनेच्या तीन दिवसानंतर शेतकरी दाम्पत्याने घटनेची तक्रार भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र, तरी ही पोलिसांनी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून शेतकरी दाम्पत्या पोलीस स्टेशनला उशिरा आल्याने तपास पूर्ण करुन लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपने या प्रकरणात उडी घेत हे प्रकरण निंदनीय असून या प्रकारात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करायला हवा होता. तीन तासांच्या आत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तसेच त्यासंदर्भात मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP Andolan | शेतकरी कर्जवाटपासाठी भाजपचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन