नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session)  उद्यापासून सुरुवात होत असून त्यासाठी आजपासून विविध पक्षातील नेते आणि आमदारांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचे असून त्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत अशा उपरोधिक आशयाचे बॅनर विमानतळावर लावण्यात आले आहे.  यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचं नागपूर विमानतळावर बॅनर लावण्यात आले आहे.  विदर्भात होणारे अधिवेशन किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar)  गटाकडून  हे बॅनर लावले गेले आहे.


विदर्भात होणारे अधिवेशन किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी होत असते. विरोधी बाकांवर असताना प्रत्येक पक्ष किमान तीन आठवड्यांचा अधिवेशन घ्या असा आग्रह धरतो. यंदा 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात फक्त दहा दिवस कामकाज होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दहा दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली उडवण्यासाठी विमानतळावर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा दर्शनी भागात हे बॅनर लावले गेले आहे 


नागपुरात मोठा बंदोबस्त, 11 हजार पोलीस तैनात


विधीमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनादरम्यान नागपुरात  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिवेशन काळात नागपूरातील रस्त्यांवर तब्बल अकरा हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनात असणार आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात या पूर्वी एवढ्या मोठ्या संख्येंने पोलिसांची तैनात कधीही झाली नव्हती. पोलीस अधिकारी या विषयावर जास्त बोलायला तयार नाही, मात्र राज्यात सुरु असलेले आरक्षणासंबंधी विविध आंदोलने आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये गेले काही दिवस झालेली वाढ हे लक्षात घेता एवढी प्रचंड सुरक्षा व्यवस्था लावण्यात आल्याचे समजत आहे.


हिवाळी अधिवेशनात कडेकोट सुरक्षा



  • विविध ठिकाण, इमारती आणि व्हीआयपी सुरक्षेसाठी तब्बल 11 हजार पोलीस तैनात.

  • व्हीआयपी सुरक्षा ही पोलीसांची प्राथमिकता

  • राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक असणार 24  तास तैनात.

  • शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न.  

  • आतापर्यंत 46 पेक्षा जास्त मोर्च्यांना परवानगी

  • अधिवेशन काळात जवळपास 100 मोर्चे धडकणार असा अंदाज.

  • मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हीलंस वॅन तैनात राहणार


आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम


आज विधिमंडळाचे अधिवेशनाच्या परंपरेनुसार संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सत्ता पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम होईल. तर चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचे असून त्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत अशा उपरोधिक आशयाचे बॅनर विमानतळावर लावण्यात आले आहे.  


हे ही वाचा :


Winter Assembly Session: हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी