OBC Mahasangha on Manoj Jarange: नागपूरमनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)  देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. आंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोकांनी जरांगेंच्या सभेसाठी हजेरी लावली आहे. जरांगेंच्या याच सभेवर ओबीसी महासंघानं (OBC Mahasangha) आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या सभेच्या आयोजनाला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला आमचा विरोध कायम असल्याचंही ओबीसी महासंघानं म्हटलं आहे. 


राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मनोज जरांगेंचं अभिनंदन करत मराठा आरक्षणाचं समर्थन केलं. परंतु मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला आमचा विरोध कायम आहे, असं अध्यक्ष बबनराव तायवाडे (National OBC Federation President Babanrao Taywade) यांनी म्हटलं. पण सरकारने भूमिका बदलण्याचा विचार जरी केला तर आम्ही जरांगे यांच्यापेक्षा मोठे आंदोलन उभे करु, असा इशारा बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी दिला आहे. 


... तर आम्ही जरांगे यांच्या पेक्षा मोठं आंदोलन उभं करू : मनोज जरांगे 


ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले की, "आजच्या सभेच्या आयोजनाला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मनोज जरांगे यांचं अभिनंदन करत मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आहे. मात्र सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा आमचा विरोध कायम असल्याचं सांगितलं आहे. दबावात राज्य सरकार असं करणार नाही, असं आम्हाला राज्य सरकारनं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकारनं जर दबावात आपली भूमिका बदलण्याचा विचार जरी केला तर आम्ही जरांगे यांच्या पेक्षा मोठं आंदोलन उभं करू"                 


पाहा व्हिडीओ : Nagpur Babanrao Taywade:सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीचा आमचा विरोध