नागपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी दुरुस्ती कार्यक्रम जाहीर केला आहे. यात 1 ऑक्टोबर 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदवता येईल. तसेच मतदार संघातील नाव बदलणे, मतदार यादीतील नाव वगळणे आणि मतदार यादीतील माहितीत दुरुस्ती करणे शक्य होईल.
अशी करा मतदार नोंदणी
यासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत कार्यालयात ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज www.nvsp.in या संकेतस्थळावर करायचा आहे. नमुना 6, 7, 8 आवश्यकतेनुसार अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
2023मध्ये अंतिम मतदार यादी
या कार्यक्रमात दावे, हरकती, अर्ज 09 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर 2022 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. या कालावधीत दोन शनिवार आणि दोन रविवार विशेष मोहीम राबण्यात येईल. 26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील 05 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आर. विमला यांनी केले.
NMC Elections : प्रभाग चारचं, नव्याने आरक्षण; पुन्हा आरक्षणाचे दिव्य?
निवडणूक ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक करण्यासाठी...
खालील प्रक्रिया FOLLOW करा
1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल. वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.