Petrol-Diesel Price Today 5th August 2022 : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) दरातील दिलासा शुक्रवारीही कायम आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या दरांनुसार तेलाचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचे दर काय?


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच
केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते, त्यानंतर तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.53 आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $94.09 वर पोहोचली आहे. 


महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत?
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर 
पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.38 रुपये तर डिझेलचा दर 92.89 रुपये प्रतिलिटर आहे. 
नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.83 रुपये तर डिझेलचा दर 93.33 रुपये प्रतिलिटर 
नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर
कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107.43 रुपये तर डिझेलचा दर 93.93 रुपये.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).