Malegaon Sakhar Karkhana Election Result 2025 : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. तर अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 7,722 मतदानापैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आतापर्यंत 7,722 मते मोजून झाली आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या पॅनेलचे उमेदवार राजू भोसले यांना फक्त 251 मते मिळाली आहेत. अजित पवारांचे उमेदवार रतन भोसले यांना 3926 मते मिळाली आहेत. तर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे उमेदवार बापूराव भोसले 3,510 मते मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचा उमेदवार 416 मतांनी आघाडीवर आहे.
दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनेलला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. अनुसूचित जाती प्रवर्गात बळीराजा पॅनेलच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली आहेत.
इतर मागास प्रवर्गामध्येही अजित पवारांचा उमेदवार पुढे
इतर मागास प्रवर्गाची 2,680 मते मोजून झाली आहेत. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे हे 197 मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी पॅनलचे रामचंद्र नाळे हे पिछाडीवर आहेत.
माळेगावसाठी चार पॅनेल रिंगणात
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.
Ajit Pawar Won : ब वर्ग गटातून अजित पवार विजयी
या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध ठरली. त्यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.
Malegaon Sugar Factory Result : माळेगावमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका कुणाला?
माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झाले असले तरी बाकी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झालं आहे. मत पत्रिका छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर मतमोजणी होईल. क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांचे पॅनेलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर आहेत..अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत.
ही बातमी वाचा: