Vijay Vadettiwar on Badlapur Crime : दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलं. सध्या बदलापुरात (Badlapur School Crime) तणावपूर्व शांतत आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे. 


दरम्यान, याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका करत निशाणा साधला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या राज्यामध्ये 11 तास त्या मुलींना बसवून ठेवलंय. त्या मुलीची आई गर्भवती होती, असे असतांना ती बाकड्यावर झोपली होती. त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटली  नाही का? घटनेचा निषेध करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडत आहात. मात्र याच वेळी महिलांवर लाठीचार्ज करताना राज्यकर्ते म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही? असा संतप्त सवाल करत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर घणाघात केलाय. 


मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 57% गुन्हात वाढ- विजय वडेट्टीवार  


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज 57% गुन्हात वाढ झालीय. मागच्या सात महिन्यांमध्ये एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 57% गुन्हेगारीत वाढ होते, याचे उत्तर द्यायला नको का? 13 तारखेला ही घटना होते आणि 16 तारखेला रिपोर्ट दाखल होतो, तुम्ही कारवाई करत नाही आणि वाचवण्याचा प्रयत्न करता,जनता रस्त्यावर येतात तर तुम्ही लोकांकडे बोट दाखवता. राज्यात तीन तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतोय, पोलीस यंत्रणा कुठे आहे? सरकार आहे कुठे? अशा तक्रारींचा पाढा वाचत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.


प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?


बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलीय, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केलीय, ज्याने लोकसभेची निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 


हे ही वाचा