Maharashtra Politics मुंबईआगामी  विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष  देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केलाय. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ आजपासून विदर्भ दौरा करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) हे प्रत्यक्ष मैदानात उतरून पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करणार आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार का? याकडे आता सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार?


मनसेच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त विदर्भातील काही जागांवर मनसेचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ज्या विधानसभा जागांवर सक्षम आणि त्या भागात ताकद असलेला उमेदवार दौऱ्यानिमित्ताने राज ठाकरे घोषित करणार अशी माहिती पुढे आली आहे. मागील मराठवाडा दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील चार जागांवर आपले उमेदवार घोषित केले होते. त्यामुळे विदर्भातील 62 जागांपैकी किती विधानसभांवर उमेदवार राज ठाकरे घोषित करतात, हे आता या दौऱ्यानिमित्ताने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार यांच्या पक्षाचे खासदार प्रफुल पटेलांच्या गृह जिल्ह्यात राज ठाकरेंच्या दोऱ्याला सुरुवात होणार आहे. तसेच राज ठाकरे भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्यानं ते येथे नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडं सर्वांच्या नजरा


कशी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्माण विदर्भ यात्रा?
  


-मंगळवार 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजता गोंदिया रेल्वे स्थानक 


-दुपारी दीड वाजता गोंदिया शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक


-सायंकाळी सहा वाजता भंडारा शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकारी यांची बैठक


-बुधवारी 22 ऑगस्ट रोजी अकरा वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक


-दुपारी अडीच वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकाऱ्यांची बैठक


-शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वणी यवतमाळ येथे पदाधिकारी व निरीक्षकांची बैठक


-सायंकाळी सहा वाजता वर्धा शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक


-शनिवार 24 ऑगस्ट रोजी दहा वाजता नागपूर रविभवन येथे पत्रकार परिषद


-अकरा वाजता रवीभवन शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकारी यांची बैठक 


-सायंकाळी पाच वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक 


-रविवार 25 ऑगस्ट दुपारी बारा वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक 


-दुपारी साडेतीन वाजता अकोला विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक 


-सोमवार 26 ऑगस्ट रोजी एक वाजता पातुर,बाळापूर मार्गे शेगाव मंदिर दर्शन व पदाधिकाऱ्यांची बैठक 


-सायंकाळी साडेनऊ वाजता रेल्वेने शेगाव हून मुंबई करता रवाना होतील