नागपूरः शिक्षण म्हटले की फक्त शैक्षणिकच अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे ठरत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी मानसिक आणि शारिरीक विकासही तेवढाच गरजेचा आहे. खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना तर शाळेतच याचे वर्ग असतात. मात्र झोपडपट्टीमध्ये शिकणारे आणि गरीब मुलांसाठी यासाठी कोणीही प्रयत्न करत नसल्याचे अवघ्या दहावित शिकणाऱ्या इलिशा नेरकर हिच्या लक्षात आले. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे असे तिच्या मनात आले आणि कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये तिने याची सुरुवात केली.
सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस केंद्रात अक्षर या उपक्रमाअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची व्यवस्था करुन देऊन त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियमित वर्ग सुरु केले होते. ही माहिती मिळवून इलिशाने आपल्याला 'व्यायाम से विकास'द्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मदत करायचे असल्याचे अक्षर प्रकल्पाच्या समन्यकांना सांगितले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तिला सोबत जुळवून घेतले आणि दररोज शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच त्यांचे शारीरिक व्यायाम वर्ग सुरु झाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनाही कंटाळा आला होता मात्र आता विद्यार्थ्यी स्वतः व्यायामासाठी उत्साही असल्याचे इलिशाने एबीपी माझाशी बोलतांना सांगितले.
कोरोनाकाळात लॉकडाऊन लागला आणि दळण-वळणासह सर्वकाही थांबले. विद्यार्थ्यांच्या शाळाबी बंद होत्या. खासगी शाळा तर ऑनलाइन सुरु होत्या. मात्र सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल सुरु झाले. शहरातील चिटणवीस सेंटर येथे सुरु असलेल्या अक्षर प्रखल्पाअंतर्गत सिव्हिल लाइन येथे विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोनची व्यवस्था करण्यात आली. याद्वारे आठवड्यातून सहा दिवस निरंतर हे वर्ग सुरु झाले. सुरुवातीला यात 45 विद्यार्थी होते. मात्र हळू हळू ही संख्या वाढत गेली आणि सध्या त्यांच्याकडे 85 विद्यार्थी चिटणवीस सेंटरवर ऑफलाइन शिक्षण घेत आहेत.
इंग्रजीचेही घेतले क्लासेस
यासोबतच इलिशा या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची. सध्या ती बारावीत मुंबईत शिक्षण घेत आहे. मात्र सर्व विद्यार्थ्यांसोबत तिचे आजही कनेक्ट आहे. मे 2021 पासून मार्च 2022 दरम्यान हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने झाले. मात्र आता सर्व विद्यार्थी चिटणवीस केंद्रात येऊन ऑफलाइन शिक्षण घेत आहेत. आता या 'व्यायाम से विकास'हा उपक्रम अक्षरमध्येच सलग्न करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी इलिशाला नृत्य शिक्षक आकाश बावने, फिजिकल एज्युकेशन शिक्षक मंगेश वदांड्रे यांनी मदत केली. तसेच चिटणवीस केंद्रातील अक्षर प्रकल्पाच्या समन्वयक निशा ठाकूर आणि पल्लवी कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यालय मोबाइल नंबर 9423077564 लँडलाइन नंबर- 0712-2550501 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.
FD Interest : एफडीमध्ये पैसे गुंतवताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, वाचा सविस्तर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI