FD Personal Finance Investment : आजकाल अनेक जण पैसे गुंतवण्यासाठी विविध योजनांचा वापर करतात. काही जण सोने-चांदी (Gold Silver), शेअर मार्केट (Share Market), म्युच्युअल फंड (Mutual Fund) किंवा एफडीमध्येही (FD) पैसे गुंतवतात. जर तुम्हीही एफडीमध्ये (FD) पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. या लक्षात घेतल्यास तुम्हाला एफडीमध्ये पैसे गुंतवणूक करुन योग्य फायदा मिळवता येईल.

भारतीय रिजर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नुकतीच रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता बँकांनी कर्ज दरातही वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. एफडीमध्ये कधी पैसे गुंतवल्याने फायदा होईल, अशा संभ्रमात जर तुम्ही असाल तर हा संभ्रम येथे दूर करून घ्या. 

येथे गुंतवा पैसे?

तुम्ही स्मॉल सेव्हिंग स्कीम, एफडी, टार्गेट मॅच्युरिटी फंड, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स, डेट फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूकीवरील व्याज दर जाणून घ्या.

योजना व्याज दर (टक्के)
डेट फंड 5.25 - 5.45
एफडी  5.5
PPF 7.1
SSY 7.6
KVP  6.9
SCSS  7.4

 

महत्त्वाच्या इतर बातम्या