Vidarbha Weather Update : विदर्भात पुन्हा अवकाळी (Unseasonal Rain) पावसाचे ढग दाटण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या (Regional Meteorological Centre) वतीने वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस विदर्भात (Vidarbha) तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
24 फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तर 25 आणि 26 फेब्रुवारीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन नागपूर(Nagpur News) प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतरत्र भागात अवकाळी पावसासह गारपीटीने हजेरी लावली होती. त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला, फळबागा आणि आंबा, संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका बसला होता. एकट्या विदर्भात हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला असून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर कारवी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मात्र अद्याप ती मदत मिळालेली नसल्याचे चित्र आहे. अशातच पुन्हा रविवारपासून गडगडाटासह अवकाळी पाऊस विदर्भात आणि राज्यातील काही भागात हजेरी लावेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
सध्याघडीला नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 30 अंशावर पोहोचला आहे. शिवाय दिवसा उन्हाच्या झळा अधिक तीव्र असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळा संपण्याआधीच उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव सध्या होत आहे. मात्र आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रविवार, 25 ते 27 या तीन दिवस ढगाळ वाढावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडी वाढणार नसली तरी पावसामुळे तरी उन्हापासून दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, वेचणीला आलेला कापूस आदींसह भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेत शेतात काढलेल्या पिकांचे योग्य व्यवस्था करावी, झालेल्या पिकाची कापणी करावी, असे आवाहन नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या