उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की मी मुख्यमंत्री नाही तर आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेललं आहे. आव्हान मोठं आहे, मात्र छोटी आव्हानं आपण स्वीकारत नसतो, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
शेतकरी कर्जमाफीचे संकेत -
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे संकेत दिले आहे. संपूर्ण देशामध्ये शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे. यावेळी शेतकरी कर्जमुक्तीसाठी मी पहिली सभा नागपूरमध्ये घेतली असल्याचीही आठवण त्यांनी सांगितली.
हेही वाचा - पडद्यामागचं अधिवेशन, दिवस दुसरा
हेही वाचा - जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् चार प्रभाग पद्धत रद्द होणार?
Shivsmarak I शिवस्मारकात भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करणार : मुख्यमंत्री I एबीपी माझा