Nagpur News : कंपनीतून ट्रकमध्ये माल भरल्यावर तो ट्रकच चोरीला गेल्याची खोटी तक्रार देत, त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला नंदनवन पोलिसांनी (Nandanvan Police) अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.


अनुरोध सुरेश यादव (वय 42, रा. पवारीनगर, कापसी), लालबहादुर उर्फ ए.बी. वल्द रामबचन सनेहिया (वय 32, रा. भोलेश्वर सोसायटी, पुनापूर चौक, भवानीनगर), रजत सुरेश धारपांडे (वय 24, रा. शिवशक्तीनगर चौक, नविननगर रोड, पारडी) आशिष अभिमन्यू शहारे (वय 28, रा, न्यू कैलासनगर, मानेवाडा रोड), अंकेश तिलकचंद कारेमोरे (वय 26, रा. सत्यम नगर, बहादुरा) अशी आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुरोध सुरेश यादव याने झारखंड येथील कंपनीतून आपल्या ट्रकमध्ये (एमएच-40 सीडी 1068) यामध्ये 9 हजार 830 किलो अॅल्युमिनियम वायर असा 2 लाखांचा माल भरला होता. हा ट्रक गुजरात येथील सिल्वासा येथे पोहोवायचा होता. दरम्यान ट्रक घेऊन तो नागपुरला आला. अनुरोध याने आपला मित्र लालबहादूर समेहिया यास संपर्क करीत, त्याला ट्रकमधील वायर विकायचे असल्याची माहिती दिली. यानंर रजत घारपांडे, अंकेश आणि आशिष यांच्या मदतीने ट्रकसह अॅल्युमिनियम विक्रीसाठी बंटी चौरसिया यांच्या गोदामात ठेवला. 


कर्जबाजारीपणामुळे रचना प्लॅन


दरम्यान अनुरोध याने ट्रक चोरीला गेल्याची तक्रार पारडी पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली असता, त्यांच्या गुप्त बातमीदाराने या क्रमांकाचा ट्रक बंटी चौरसिया यांच्या गोदामात असल्याचे सांगितले. पोलिसांनी छापा टाकून ट्रक जप्त केला. याशिवाय अनुरोध यास ताब्यात घेत विचारणा केली असता, त्याने व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे कर्जबाजारी झाल्याने नुकसान भरुन काढण्यासाठी हे षडयंत्र रचल्याची कबुली दिली. त्यातून त्याच्या साथीदारांनाही अटक करीत पारडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


अनियंत्रित सिमेंटचा ट्रक उलटला


एका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित सिमेंटचा ट्रक उलटला. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. ही घटना रविवारी पहाटे मानकापूर चौक येथे घडली. एमएच 34 बी 1981 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर येथून 300 सिमेंटची पोती घेऊन छिंदवाडा येथे जात होता. यादरम्यान इंडोर स्टेडियम चौकात ट्रक समोर कार आली. कृष्णकांतने जोरात ब्रेक दाबला. अनियंत्रित होऊन ट्रक उलटला. सिमेंटची पोती परिसराच पसरली. हॉटेल दावत, सिक्स टेन या दुकानांवर सिमेंटची पोती पसरली होती. रविवारी दुपारी क्रेनच्यामदतीने ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेशी सिमेंटची पोती घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Mulayam Singh Yadav Demise: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Shiv Sena Symbol Crisis : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल