Nagpur News Update : बेरोजगारीची समस्या अल्पसंख्यांक सह समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. मात्र, हे खरे आहे की अल्पसंख्यांक समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळायला हवं तो वाटा मिळत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपुरात केलं आहे.  सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांची यादी पाहिली तर मुस्लिमांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांच्या योगदान लक्षणीय आहे.. त्यामागे उर्दू भाषेचा योगदान महत्वाचं आहे. आज आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, तर बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवांनी मांडलेल्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी पुढच्या वेळी जेव्हा येईन, तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुमच्या खांद्याला खांदा लाऊन काम करेन, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. 'विदर्भ मुस्लीम इंटलॲक्चुअल फोरम'च्या मंचावर ॲड. फिरदोस मिर्झा (Firdos Mirza) यांनी आज अल्पसंख्यांक समाजातील समस्या अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी पवार बोलत होते.


पुढे पवार म्हणाले, राजकीय पक्ष मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नाही हा तुमचा आरोप आहे. इतर पक्षांचे मला माहिती नाही. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात 50 ते 50 आमदार आहेत. केंद्र सरकारमध्ये आमचे 8 जण आहेत. त्यांपैकी दोघे मुस्लिम आहेत.   केवळ मते घेण्यासाठीच आमचा वापर केला जातो, असा आरोप राजकीय पक्षांवर होत असताना, त्यावर अल्पसंख्यांकांमध्येच या समस्या नाहीत तर अल्पसंख्यांकांमधील इतर धर्मीयांनाही असे प्रश्‍न भेडसावतात, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. 


फोरमच्या मंचावर फिरदोस मिर्झा, राजा बेग, परवेझ सिद्दीकी, डॉ. अजीज खान आणि डॉ. शकील सत्तार आणि आमदार सुनील केदार उपस्थित होते. फोरमच्या सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर बोलताना पवार म्हणाले, मी नागपुरात आल्यावर फोरमच्या सदस्यांना आपल्यासोबत चर्चा करायची आहे, असे मला सांगण्यात आले. तेव्हा 20 ते 25 लोकांसोबत बैठक असेल, असे समजून मी आलो. पण येथे तर हॉल संपूर्ण भरला आहे.  


पुढे पवार म्हणाले,  आज तुमचे सर्व प्रश्‍न ऐकून, समजून घेतले. त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो, उपाययोजना काय करायच्या याच्यावर विचार करून दोन ते ती आठवड्यांनी पुन्हा येईन तेव्हा आपण सविस्तर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले. कारण केवळ अर्ध्या-एक तासात ही चर्चा होऊ शकत नाही. तुमचे प्रश्‍न ऐकल्यानंतर असे वाटले की मी येथे निवडणुकीसाठी मते मागायला आलो आहे. पण त्यासाठी मी आलेलो नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur ZP : नागपूर झेडपीत चाललंय काय? जिल्हा परिषदेत कॉंग्रेसमधील नाराज गट भाजपच्या मदतीला!


सरसंघचालकांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा निशाणा; म्हणाले, फक्त माफी मागून चालणार नाही, तर व्यवहारातही बदल हवा