नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 14 ऑगस्ट पासून आयोजित करण्यात आलेल्या अखंड भारताच्या फाळणीवरील विभाजन विभीषिका प्रदर्शनाचा उद्या 17 ऑगस्ट शेवटचा दिवस आहे. फाळणीची अंगावर काटा आणणारी भीषणता या प्रदर्शनात चित्ररूप मांडण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू केंद्रात आयोजित या प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.


स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारतातील बंगाल, पंजाब, सिंध प्रांत यातील शेकडो जण नागपूरचे रहिवासी झाले. त्यांची दुसरी, तिसरी पिढी आता शहरात स्थिरावली आहे. मात्र आपल्या वडिलांकडून, आजोबांकडून, आजींकडून फाळणीच्या ऐकलेल्या भीषण आठवणींना प्रदर्शनात चित्ररूप पाहताना अश्रू अनावर झालेले चेहरे, जिल्हाधिकारी कार्यालयात फाळणीवरील आयोजित प्रदर्शनातील 'विजिटर्स बुक ', मधल्या नोंदी , अंगावर काटा आणणाऱ्या आहे.


आज शेवटचा दिवस


नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला मात्र फाळणीचे दुःख घेऊनच. जगातला सर्वात मोठा नरसंहार फाळणीच्या काळातील दंगलीमध्ये झाल्याचे बोलले जाते. हे फाळणीचे दुःख काय होते. नेमकी परिस्थिती कशी उद्भवली होती. त्यावेळेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला कसा. लंडनच्या संसदेमध्ये झालेल्या निर्णयाचे अंमलबजावणी कशी झाली. त्यावेळेसची नेमकी परिस्थिती काय होती. वृत्तपत्रातल्या बातम्या काय होत्या. त्यावेळेसची छायाचित्र कोणत्या वेदना सांगतात. अशा अंसंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे प्रदर्शन सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. 15 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. आज 17 ऑगस्ट प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.


अन् संयुक्त सभ्यता भंग पावली


प्रत्येक जिल्ह्यात हे प्रदर्शन सुरू आहे. भारताचे विभाजन ही इतिहासातील सर्वात मोठी मानवाचे स्थलांतर होते. हजारो वर्षांपासून एकमेकांसोबत राहणारे एकमेकांच्या प्रथा परंपरा व एकोपा जोपासणारे नागरिक एका निर्णयामुळे अनोळखी प्रदेशात स्वतःचा निवारा शोधण्यासाठी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांसह लहानशा चिमुकल्यासह उपाशीपोटी शेकडो किलोमीटर पायी चालत अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवत होते. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्याचा पाकिस्तान असणाऱ्या भागातून 60 लाख गैर मुस्लिम भारतात आले तर पंजाब दिल्ली बिहार आदी प्रांतातून 65 लाख मुस्लिम पश्चिम पाकिस्तान मध्ये गेले. सध्याचा बांगलादेश व तत्कालीन पूर्व पाकिस्तान मध्ये हीच संख्या 20 लाख गैर मुसलमान भारतात आले तर दहा लाख मुस्लिम त्यावेळी पश्चिम बंगाल मधून पाकिस्तानात गेले. शेकडो वर्षाची संयुक्त सभ्यता भंग पावली.


Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम


फाळणीचे दुःख स्थलांतरितांना अधिक


भारताच्या अन्य भागांपेक्षा उत्तर भारत व पूर्व भारतातील भागात हे स्थलांतर अधिक झाले त्यामुळे त्या फाळणीचे दुःख स्थलांतरित लोकांना अधिक आहे. त्यामुळे या प्रदर्शनात मोठ्या संख्येने ही दुःख भोगलेल्या परिवारातील दुसऱ्या तिसऱ्या पिढ्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने बघायला येत आहे. वेगवेगळ्या संघटनात काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, पत्रकार, विचारवंत, विद्यार्थी या सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घेणे इतिहास समजून घेण्यासारखे आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या काळामध्ये प्रदर्शन सुरू आहे.एकदा भेट देऊन इतिहासातील या वेदनादायी घटनाक्रमाला समजून घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी याशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्ह्यातील शहीद स्वातंत्र्य सैनिकांची तसेच दुर्मिळ लोकराज्य अंकाचे प्रदर्शन देखील लावले आहे. तात्काळ आधार कार्ड लिंक करण्याबाबतचा फॉर्म देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे. सकाळी १० ते ८ या काळात नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.


Mohit Kamboj Tweet : राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा?