Vidarbha Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यासह भंडारा (Bhandara) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे.  या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळं प्रशासन सतर्क झालं आहे.




भंडारा जिल्हातील पुरपरीस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत. आज भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा, शिकवणी वर्ग,आंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात कालपासून पूरस्थिती उद्भवली आहे. ही पुरपरीस्थिती लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान, गडचिरोली, भंडारा चंद्रपूर  या तीन  जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गोसीखुर्द धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क असून गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात अनेक मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहे. तर भांडार शहरासह  जिल्ह्यांमधून अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.




राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भंडारा आणि गोंदियाचा समावेश आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्येही चांगला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यासह कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह परिसरात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरांतही चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.


महत्वाच्या बातम्या: