हे शिक्षक काम करत असलेले कनिष्ठ महाविद्यालय शासनाकडून अनुदानासाठी पात्र ठरल्यानंतरही शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. गेल्या 18 वर्षात राज्यात 5 मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक शिक्षण मंत्र्यांनी सत्ता उपभोगली. अनेक वेळा आश्वासने देऊनही आर्थिक तरतूद झाली नाही. परिणामी आज हे विना पगारी शिक्षक मोल मजुरी करण्यासाठी, सायकलवर फिरुन चणे, फुटाणे, डाळी, मसाले विकण्यासाठी मजबूर झाले आहे. राज्यात ज्युनियर कॉलेजच्या अशा विना पगारी शिक्षकांची संख्या 23 हजार आहे. नव्या राज्य सरकारकडून मोठ्या अपेक्षा घेऊन हे शिक्षक राज्यातील कानाकोपऱ्यातून सध्या नागपूरात आले आहे. यापैकी काही शिक्षकांनी त्यांची व्यथा एबीपी माझासमोर व्यक्त केली.
मधू तिहारे यांच शिक्षण एमएससी झालं आहे. मात्र, सध्या ते गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात सकाळी सायकलवर फिरुन चणे, फुटाणे, डाळी विकतात. त्यानंतर ते दुपारी ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात. तर, शाहदुल्ला अब्दुल अंसारी, शिक्षणाने एमएससी बीएड आहेत. जीवविज्ञान हा विषय ते शिकवतात. मात्र, पगार मिळत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात गावागावात फिरुन मसाले विकण्याचंही ते काम करतात. त्यामुळे त्यांना संपूर्ण तालुक्यात मसाले वाले गुरुजी असही म्हणतात.
गणेश ढोरे हे 5 विषयात एमए आहेत, बीएड आणि एमफिलही केलं आहे. मात्र, शैक्षणिक व्यवसायातून कोणताही पगार मिळत नसल्यामुळे गणेश सकाळी कॉलेज आटोपल्यानंतर शेतावर शेतमजूर म्हणून काम करतात. किमान आईचा मृत्यू होण्यापूर्वी एकदा तरी पगार द्या असे आर्जव त्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या -
महापालिका शाळेतल्या विद्यार्थी संख्येत गेल्या पाच वर्षात 24 टक्क्यांनी घट
जामियाची तुलना जालीयनवाला बागेशी म्हणजे शहीदांचा अपमान : देवेंद्र फडणवीस
Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha