नागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा (Dengue) प्रसार नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा आणि 6 सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करा असे निर्देश नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) नागपूर महापालिकेला (Nagpur Municipal Corporation) दिले आहेत. महापालिका डेंग्यूचा प्रसार नियंत्रित करण्यामध्ये अपयशी ठरली आहे, अशी जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.


नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसात डेंग्यू आजाराचा प्रसार तीव्रतेने झाला असून मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण समोर येत आहेत. जनहित याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने शहरात 1245 डेंग्यूचे रुग्ण असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेने गेल्या पंधरा दिवसात डेंग्यूचे 92 रुग्ण असल्याचा माहिती दिली आहे.


काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये पाऊस झाला. त्यामुळे साचलेल्या पाण्याने शहरातील उत्तर आणि पूर्व नागपूर भागात डेंग्यूचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. नागरी वस्त्यांमधील वाढती रुग्ण संख्या आधीच नागपूर महानगरपालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला असताना शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे डेंग्यूचा धोका आणखी वाढला आहे.


महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जनजागृतीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. मात्र डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने नागपूरमध्ये परिस्थिती चिंतेची बनली आहे


डेंग्यू कशामुळे होतो?



  • डेंग्यूची लागण एडिस एजिप्ती जातीच्या डासाची मादी चावल्याने होते

  • साचलेल्या स्वच्छ पाण्यात हा डास आपली अंडी देतो

  • या अंड्यांपासून एडिस डासाची उत्पत्ती होते

  • हा डास जमिनीपासून दोन फुटांपेक्षा जमिनीवर उडतो

  • विशेष म्हणजे हा एडिस डास दिवसा चावतो 


डेंग्यूचा फैलाव होण्याची कारणे



  • जागोजागी साठलेले पाणी 

  • कचरा

  • दूषित पाणी

  • हवा 


डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी काय करावं?



  • घरात व आसपासच्या जागेत कुठेही पावसाचे गढूळ पाणी जमा होऊ देऊ नका. 

  • कूलर वापरत असल्यास त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे. 

  • डासांपासून वाचण्यासाठी त्वचेला क्रीम अथवा लोशन लावावे. 

  • डासांना पळवून लावणारा स्प्रे अथवा कॉईलचा वापर करावा. 

  • रात्रीच्या वेळी मच्छरदाणी लावून झोपावे. 

  • त्याशिवाय तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, गरज पडल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी. 


डेंग्यूची लक्षणे 



  • अचानक ताप येणे, वाढणे

  • तीव्र डोकेदुखी सुरु होणे

  • डोळ्यांच्या खालच्या भागात दुखणे

  • सांधे व मसल्स दुखणे

  • खूप थकल्यासारखे वाटणे

  • उलटी होणे वा सतत उलटीची भावना होणे

  • त्वचेवर रॅशेस येणे

  • नाक अथवा तोंडात, हिरड्यांना सूज येणे.


हेही वाचा


Nagpur : नागपुरात डेंग्यूचा धोका वाढला! मुसळधार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ