नागपूर : सुनील केदार (Sunil Kedar) यांचं शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होणं संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) ज्या पद्धतीने ललित पाटीलला (Lalit Patil) तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले होते तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
आशिष देशमुख म्हणले, 22 तारखेला न्यायालयाने सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या बहुतांशी सर्व चाचण्या ते योग्य असल्याचे सांगत असून या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी.
सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात : आशिष देशमुख
ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना 22 वर्षानंतर न्याय मिळाला त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घेऊन तुरुंगवासापासून थांबवणे योग्य नसल्याचे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सुनील केदार रुग्णालयात
सुनील केदार यांना सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी असल्याने ऑक्सिजनवर ठेवले आहे.शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्यांनी प्रकृती संदर्भात काही तक्रारी डॉक्टरकडे केल्या होत्या. त्यांनी मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मायग्रेनच्या उपचाराचा भाग म्हणून सध्या केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान सुनील केदार दाखल असलेल्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हे ही वाचा :
Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द