नागपूर : राज्यातील अनेक सैनिक शाळांमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. पण एनडीएच्या परीक्षांमध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आपले विद्यार्थी एनडीएच्या परीक्षांमध्ये पास होत नाहीत. त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे. ज्यामुळे सीबीएससीच्या शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. 


नागपुरातील भोसला सैन्य शाळेच्या 25 व्या वार्षिक उत्सवात शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भोसला सैनिक शाळेने मुलींच्या सैनिक शाळेला परवानगी मागितली आहे. ती परवानगी एका महिन्याच्या काळात मिळेल, असं देखील दीपक केसरकरांनी म्हटलं. 


जगात आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ देण्याची क्षणता भारताकडे - दीपक केसरकर


जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर देशातील भाषा शिकाव्या. महाराष्ट्रातील मुलांमध्ये काहीही कमी नाही.मात्र, एक कमतरता आहे, ती म्हणजे कामाचा कमीपणा मानण्याची वृत्ती.परदेशातील मुले कोणतेही काम करण्यासाठी कमीपणा मानत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


CBSE Board Exam 2024: सीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर; कधी होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा?