नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असलेल्या आणि संघाच्या मुख्यालयात असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तसेच न्यायालयाच्या सूचनेनंतरही माहिती न दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात मोहनीश जबलपुरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार सादर केली होती.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा आहे. या शस्त्रांचे विजयादशमीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यानतीने पुजा करण्यात येते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता मोहनीश जबलपुरे यांनी 2018 मध्ये राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या शस्त्र पुजन संदर्भात कोतवाली पोलीसांना माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली होती. त्याच प्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय ज्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून यासंदर्भात पुढील चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.


माहिती अधिकारात...


जबलपुरे यांनी माहिती अधिकारात विचारले होते की, आरएसएसकडून पूजन करण्यात येणारे शस्त्राचे परवाने आहे का? ते परवाने कोणाच्या नावावर आहेत. हा शस्त्रसाठा निवडणूका किंवा अपात्कालीन परिस्थीतीमध्ये पोलीस ठाण्यात जमा करण्यात येतो का? यावर कोतवाली पोलिसांच्यावतीने कुठलेच उत्तर देण्यात आले नव्हते. यानंतर मोहनीश जबलपुरे यांनी कोतवाली पोलिस स्ठानकात यासंदर्भात तक्रार सादर केली होती.


हळव्या बापाला न्यायालयाची साथ, मुलासोबत व्हिडीओ कॉलवर 40 मिनिटे बोलण्यास दिली परवानगी


म्हणून याचिकाकर्ता कोर्टात


यानंतरही कुठलीही कारवाई झाली नसल्याने याचिकर्ता यांनी कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाने पोलिस ठाण्यात नोटीस दिली गेली. मात्र पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा तक्रारकर्ताने कोर्टात धाव घेऊन पोलीसांनी नोटीसला प्रतिसाद दिला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. यावर जिल्हा न्यायालयाने पुन्हा कोतवाली पोलिसांना नोटीस जारी करुन चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होईल. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. संतोष चव्हाण यांनी बाजू मांडली.


Special Trains : 32 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेनचे नियोजन, 13 सप्टेंबरपासून धावणार गणपती फेस्टिव्हल ट्रेन


यापूर्वीही आंदोलन


एखाद्या नागरिकाकडे विनापरवानगी शस्त्र आढळल्यास त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात येतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पोलीस महेरबान का? असा सवाल यापूर्वी अनेक आंदोलकांनी करुन पोलीसांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला होता. तसेच कायदा सर्वांसाठी सामान असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यापूर्वी अनेकांनी केली आहे.