नागपूरः कौटुंबिक वादातून वेगवेगळे झालेल्या पती-पत्नीतील वाद न्यायालयात पोहोचला. मुलाच्या ताब्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे. अद्याप मुलाच्या ताब्यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याने याचिकाकर्त्या बापास अमेरिकेहून मुलासोबत बोलण्याची परवानगी हवी होती. त्यासाठी न्यायालयाने 40 मिनिट बोलण्याची विनंती मान्य केली. सध्या भारतात असल्याने मुलासोबत संवाद साधता येते. परंतु, अमेरिकेत गेल्यास काय? अशी चिंता असल्याने हळव्या बापाने आपल्या मुलासाठी न्यायालयाकडे तशी दाद मागितली होती. न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला. आज, रविवारी बाप अमेरिकेत परतणार आहे. याचिकाकर्त्यातफें अॅड. तुलिका भटनागर तर, पत्नीतफे अॅड. आयुष शर्मा आणि अॅड. विराट मिश्रा यांनी बाजू मांडली.


अमेरिकेला जाण्यापूर्वी भेटीची परवानगी


न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी पूर्ण केली नाही. प्रकरणावर पूर्ण सुनावणी करण्यासाठी वेळ अपुरा असल्याने दोन्ही बाजुच्या सहमतीने याचिकेवरील सुनावणी 30 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. याचिकाकर्त्याच्या वकीलाने त्याच्या अशीलास अमेरिकेत परतायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे एक दिवस जाण्यापुवीं असल्याने मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने दुपारी 1 ते सायंकाळी 7 पर्यंत मुलाला भेटण्याची परवानगी दिली.


Nagpur ZP : माध्यमिक शिक्षण विभागातील तिघांना कारणे दाखवा, सदस्यांशी असभ्य वर्तणूक भोवणार


पत्नी मुलासोबत अमेरिकेला आल्यास करणार पूर्ण सोय!


सुनावणीवेळी मुलाला बापास भेटण्याची विनंती करण्यात आल्यावर पत्नीनेही कुठलाच विरोध केला नाही. उलटपक्षी, भेटीला नाहरकत असल्याचे सांगितले. याचिकाकर्ता अमेरिकेत परतल्यास त्याला मुलासोबत रोज बोलण्याची परवानगी असावी. यासाठी न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतरच न्यायालयाने भारतात असल्यास सायंकाळी 4.30 वाजता आणि अमेरिकेत असल्यास सायंकाळी 7.30 नंतर 40 मिनिटे व्हिडिओ संवाद साधता येईल अशी परवानगी दिली. दरम्यान, पत्नी मुलाला सोबत घेऊन अमेरिकेत येण्यास तयार असेल तर दोघांचीही पूर्ण व्यवस्था करण्यात येईल, असेही याचिकाकर्त्याने स्पष्ट केले. शिवाय, असे केल्यास कुठलाही त्रास होणार नाही, याचीही हमी दिली. परंतु, या मुद्यावर दोघांमध्ये एकमत होऊ शकले नाही.


Vaishno Devi Yatra : माता वैष्णोदेवी यात्रा तुर्तास स्थगित, दर्शनावर बंदी, देवस्थान समितीचा निर्णय


पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांवर चाकूलहल्ला


नागपूरः म्हाळगीनगर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका तरुणाने पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना विनाकारण शिवीगाळ करत त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यात एक कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी तरुणाना ताब्यात घेतले आहे. श्रीकांत उर्फ दादू हेमराज फटिंग (वय 24 रा. आशीर्वादनगर) असे हल्लेखोराचे नाव आहे.