एक्स्प्लोर

नागपुरात 12 मीटर रुंदीचा रस्ता चोरीला, पोलिसात तक्रार दाखल

म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन शासकीय विभागांकडून एकमेकांवर ढकला-ढकलीच्या धोरणामुळे म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले 24 वर्ष रस्त्याविना आहेत. आता या सर्वानी शासनाविरोधात एल्गार पुकारत रस्ता चोरीची तक्रार दाखल केली आहे.

नागपूर : नागपूर शहरातील भारतीय नगर परिसरात राहणाऱ्या म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात केली आहे. मागील 24 वर्षांपासून रस्ता बनत नसल्याने त्रस्त होऊन म्हाडा कॉलोनीच्या रहिवाशांनी हे पाऊल उचलले आहे. शिवाय शासनाचा निषेध म्हणून आपल्या घरावर काळे झेंडे आणि बॅनरही लावले आहेत. मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल मात्र नागपूरमध्ये मनकापूर पोलीस स्टेशनमध्ये रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन शासकीय विभागांकडून एकमेकांवर ढकला-ढकलीच्या धोरणामुळे म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले 24 वर्ष रस्त्याविना आहेत. आता या सर्वानी शासनाविरोधात एल्गार पुकारत रस्ता चोरीची तक्रार दाखल केली आहे. शहरातील भारतीय नगर परिसरात म्हाडाने 1995 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबाना साडे चारशे चौरस फुटाचे घर दिले होते. 1995 च्या नकाशावर मंजूर असलेला आणि मुख्य बाजारपेठेपासून म्हाडा कॉलोनीला जोडणारा 12 मीटर रुंदीचा रस्ता होईल, अशी अपेक्षा या नागरिकांना होती. प्रत्येक वेळेला मागणी केल्यास 15 दिवसात तुमचा रस्ता बांधून देतो, असे आश्वासन राजकारण्यांकडून मिळत होते, असं स्थानिकांनी सांगितलं. मात्र, रस्ता झालाच नाही. हळू हळू या प्रस्तावित रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही संस्थांनी आणि काही स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रस्तावित रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करत भिंत बांधून म्हाडा कॉलनीच्या लोकांचा ये जा करण्याचा मार्गच बंदिस्त केला. त्यामुळे स्थानिकांनी या समस्येला कंटाळून रस्ता चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली. या अजब तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले. सुरुवातीला पोलिसांनी अशी तक्रार घेता येत नाही असा सूर लगावला. मात्र रहिवाशांनी 1995 च्या मंजूर नकाशात असलेला रस्ता आज अस्तित्वातच नाही, या संदर्भातील योग्य कागदपत्रे पोलिसांना दाखवले. तेव्हा पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकार केली. शिवाय पोलिसांनी रहिवाशांची समस्या म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना पाठवून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Embed widget