Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day2024) आज सर्वत्र मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा होत आहे. या निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक (Republic Day)घोषित करण्यात आले. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.


भारतीय जनमानसातील ताकद अपरंपार आहे. ती कधीही कमी नव्हती, किंबहुना ती होती तशीच आहे. हीच ताकद जेव्हा जागी होते, तेव्हा जगात अनेक चमत्कार बघायला मिळतात. जे की आज आपण बघत आहोत. 40 वर्षांपूर्वी भारत असा भरारी घेईल, असे जेव्हा आम्ही 40 वर्षांपूर्वी बोलत होतो, त्यावेळी आपलेच लोक खिल्ली उडवत होते. मात्र, आज आपण बघतो आहोत भारत आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. ही शक्ति कुठून आली, तर ही शक्ति आधी देखील होती. मात्र ती परिणामकारक तेव्हा होते जेव्हा आपण सामूहिक बंधुभावमध्ये बांधले जातो. आज त्याच बंधुभावचा परिणाम आपल्या डोळ्यापुढे असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. 


.... तर देशाचा नक्कीच उत्कर्ष झाल्या शिवाय राहणार नाही


माझ्यातील सामर्थांच्या उपयोग मला सर्वांसाठी करायचा आहे. कारण आपण सारे एक आहोत, सारे आपले आहे. आम्ही दिसत जरी भिन्न असलो तरी आम्ही एकसंघ आहोत. भारत हा असेही विविधतेत एकता मानणारा देश आहे. अशी भावना असणे गरजेचे आहे. त्यामुळे बंधुभाव सोबत देशातील प्रत्येकजण सामुहिकरित्या जर पुढाकार घेईल, संविधानाच्या अनुशासनाचे तंतोतंत पालन करेल, त्याचे पावित्र्य टिकवून ठेवले, संविधानाचा भाव लक्षात घेऊन त्याचा योग्य वापर करेल, तर या देशाचा नक्कीच उत्कर्ष झाल्या शिवाय राहणार नाही. असे देखील सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. 


भारत विश्वगुरु हे स्वप्न लवकरच पूर्ण 


देशाच्या, समाजाच्या आणि आपल्या देशातील बांधवांच्या हितार्थ सगळे व्यक्तिगत स्वार्थ, भेदभाव सोडून आपण जर सर्वस्वी देशासाठी अर्पण करण्याची तयारी आज दाखवली तर जगाच्या आणि भारतीय जनमानसाच्या ज्या अपेक्षा आपल्याकडून आहेत, की भारताने  विश्वगुरु बनाव, हे स्वप्न काही वर्षात सत्यात अवतरलेल आपण नक्कीच बघू. असा विश्वास देखील मोहन भागवतांनी बोलतांना व्यक्त केला.


भारतात आपरंपार सामर्थ आहे. मात्र हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी हा समर्पणाचा भाव सत्यात आणण्याची देखील गरज आहे. आपल्या राष्ट्रीय ध्वजावर जो वरचा रंग आहे, तो समर्पणचा रंग आहे. त्यावर जे धर्मचक्र आहे, त्याच्या वास्तविक रूपाने अर्थ बंधुभाव धर्माचा तो अर्थ आहे. हे लक्षत ठेवून आज आपण हा  प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजेल. असे देखील सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या