एक्स्प्लोर

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा संघस्थानी येण्याची शक्यता, मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष आणि  प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यांना संघाकडून निमंत्रण देण्याची सूत्रांची माहिती आहे. 16 जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदानावर हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. संघ शिक्षा तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा नागपुरात 23 मे पासून वर्गाला सुरुवात झाली असून या वर्गात देशभरातून 828 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. याच प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक मतभेद असल्याने मुखर्जींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे काँग्रेसचे म्हणणे होते. मात्र मुखर्जी यांनी ठामपणे हे आमंत्रण स्वीकारले होते.  प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सल्ला दिला होता. प्रणव मुखर्जी हे ज्ञानी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून मुखर्जी यांना निमंत्रण दिले असल्याचे आरएसएसकडून सांगण्यात आले होते. यावरुन बरंच वादंग उठलं होतं. राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रति प्रत्येकाने सच्ची निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे, अशी भावना प्रणव मुखर्जी यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Maharashtra Drought: मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
मोठी बातमी! नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक; कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र
Nagpur Politics : काँग्रेसचं ठरलं! नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजित वंजारींच्या नावावर शिक्कामोर्तब; तर भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस कायम
काँग्रेसचं ठरलं! नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजित वंजारींच्या नावावर शिक्कामोर्तब; तर भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस कायम
Nagpur News: बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून VIP विश्रामगृहाचा शासकीय निवासस्थान म्हणून वापर; काँग्रेसची थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडे तक्रार
नागपुरातील बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून VIP विश्रामगृहाचा शासकीय निवासस्थान म्हणून वापर; वर्षाला 100 कोटींचा खर्च; काँग्रेसची थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडे तक्रार

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget