एक्स्प्लोर

शेतकऱ्यांची एफआरपी देत नाहीत ते साखर कारखाने कारवाईस पात्र : राजू शेट्टी

दुष्काळ विषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले.

नागपूर : जे साखर कारखाने एफआरपी संदर्भात शेतकऱ्यांचे देणे देत नाहीत. ते कारखाने कारवाईस पात्र आहेत असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरु केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या साखर कारखान्यांनी एफआरपी देण्यासंदर्भात टाळाटाळ केली होती. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारत अनेक कारखान्यांवर कारवाई घडवून आणली होती. भविष्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच धोरण राबवेल असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेचे बफर स्टॉक करावे असा सल्ला देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून चारा आणि पाण्यासाठी जनावरं त्रस्त आहेत. पाण्यासाठी गावाकडील महिलांना वणवण भटकावे लागत असताना राज्यातील मंत्री केवळ दुष्काळी पर्यटन करीत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राज्यातील मतदान संपल्यावर दुष्काळाविषयक उपाययोजना तात्काळ सुरु करणे आवश्यक होते मात्र राज्य सरकारने याबाबतही तत्परता दाखवली नाही.  तर केंद्र सरकारचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले परंतु परिणामकारक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. दुष्काळ विषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य केला असला तरी ईव्हीएमबाबत खूप काही घटना संशय निर्माण करणाऱ्या असून या शंका दूर करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला पराभूत करण्यासाठी समविचारी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. यापूर्वी सुद्धा विरोधकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. शिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील सोबत येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.  विधानसभा निवडणूक स्वतः लढणार की नाही याबाबत आताच काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget