एक्स्प्लोर

Raj Thackeray on Separate Vidarbha : वेगळ्या विदर्भासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांसोबतच्या (BJP leaders) वाढलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीगाठी मुळे महाराष्ट्रातील राजकारणाचे (Maharashtra Politics) समिकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.

नागपूरः विदर्भातील खऱ्या प्रश्नांना बदल देत काही राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वेळोवेळी राजकारण करण्यात येते. मात्र विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा आहे का? एकदा जनतेला हा प्रश्न विचारावा त्यानंतर निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट प्रतिक्रीया राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अनेक राजकीय पक्षांकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर जनतेला भ्रमित करण्यात येते. खरच वेगळ्या विदर्भाची गरज आहे की, इतर महत्त्वाचे मुद्दे राज्यासमोर आहे याचा विचार करण्याची गरज असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसेच विदर्भ आमच्यासाठी महाराष्ट्राचा एक भाग असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिकाही चिन्हीत केली.

उद्धव ठाकरे सरकारचं मनसेनं कधीच कौतुक केलं नाही

उद्धव ठाकरे (raj thackeray on uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्यातील सरकारची स्तुती किंवा कौतूक मनसेने कधीच केले नाही. मात्र तरी काही वृत्तपत्र आणि माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पेरण्यात येतात. ही माहिती आपण कुठून आणली. कोणी सांगितली हे तरी वाचकांना सांगा. आम्ही कधीच उद्धव ठाकरे सरकारचे कधीही कौतूक केले नसल्याची स्पष्टोक्ति राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्रात छापलेल्या वृत्ताचे खंडन करताना केले. तसेच लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका असा टोलाही लागावला.

राज ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे व्हिजन खूप भव्य आहे. म्हणजे ते छोट्या गोष्टींची कल्पनाच करत नाही. त्यांचे जे काही विचार असतात ते ऐकतांना स्वप्नच वाटतात. मात्र सत्यात उतरल्यावर त्यावर विश्वास होतो. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नितीन गडकरींचे कौतूक केले. तसेच नितीन गडकरी आणि माझे संबंध वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भेटीचे वेगळे अर्थ लावून घेऊ नका असे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. रविवारी सायंकाळी राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. तसेच नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या फुटाळा (Futala) येथील कारंज्याचे (musical fountain futala) कौतूकही केले.

सोमवारी बावनकुळे यांची भेट

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सोमवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली. तसेच ही भेटही वैयक्तीक असल्याचे सांगून राजकीय चर्चा होणार नसल्याची प्रतिक्रीया दिली. मात्र गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांसोबतच्या (BJP leaders) वाढलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीगाठी मुळे महाराष्ट्रातील राजकारणाचे (Maharashtra Politics) समिकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज ठाकरेंकडून नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
Parinay Fuke : अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
Nagpur Crime News : महिला सरपंचाची थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार अन् 8 राज्यातील 50 हजार सरपंचांच्या फसवणुकीचा पर्दाफाश; मध्यप्रदेशात धडाकेबाज कारवाई, 35 महिलांना अटक
महिला सरपंचाची थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार अन् 8 राज्यातील 50 हजार सरपंचांच्या फसवणुकीचा पर्दाफाश; नागपूर पोलिसांची मध्यप्रदेशात धडाकेबाज कारवाई, 35 महिलांना अटक
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget