नागपूर : पूर्व विदर्भात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि धरणाचे पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पूर ओसरला असलं तरी लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. पुरग्रस्थ लोक आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आपला संसार निळ्या आकाश खाली थाटत आहेत. शासन कितीही लोकांच्या मदतीला धावून आल्याची बतावणी करत असेल . मात्र दवाडीपार गावातील लोकांच्या समस्यांमुळे शासन पूरग्रस्थांप्रति किती संवेदनशील आहे, ते या लोकांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. लोकांना राहायला घर नाही उघड्यावर हजारो कुटुंब आपला संसार थाटत असतात या निराधार लोकांवर आता राजकारण सुरु झालं आहे.


विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना देणार भेटी देतील तसेच पूरग्रस्त भागाचा आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे फडणवीसांचा हा दौरा राजकीय फायदा घेण्याचा प्रकार तर नाही ना? अशा सवाल या ठिकठिकाणी उपस्थित केला जात आहे.


दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आवाहन केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये.'


दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला असून ते म्हणाले की, ''पूर्व विदर्भात भयावह परिस्थिती आहे. या स्थितीला मानव निर्मित संकट म्हणेल. वेळीच अलर्ट दिले नाही. पंरतु आता तातडीने मदत देण्याची गरज आहे.', असंही ते म्हणाले.


दरम्यान, वैनगंगेच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात 3 दिवस घरं बुडून असल्यामुळे घरं खशार झाली आहेत तर अनेक कच्ची घरं जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी आजूबाजूच्या घरांच्या स्लॅबचा आसरा घेतलाय आणि सध्या तिथेच आपला संसार थाटलाय.


महत्त्वाच्या बातम्या : 


सत्तेसाठी मुहूर्त तुम्हालाच विचारून काढतो, देवेंद्र फडणवीसांनी स्वकीयांचे कान टोचले


मुंबईत कोरोना चाचण्या तातडीने वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र